ठाणे – येथील वागळे इस्टेट भागातील वीर सावरकरनगर परिसरात असलेल्या सिद्धिविनायक चाळीत एका ११ वर्षाच्या मुलाला वीजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकाराची नोंद वर्तक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा – …आणि हाती झाडू घेऊन मुख्यमंत्र्यांची ठाण्यात रस्ते सफाई

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Boy killed in gas cylinder blast karad
गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना

हेही वाचा – ठाणे : नववर्ष स्वागतानिमित्ताने साडे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

अलोक चकवे (११) असे मृत मुलाचे नाव आहे. तो शनिवारी दुपारी घराबाहेर असताना त्याचा हात घराजवळ असलेल्या लोखंडी जिन्याला लागला. या जिन्यातून त्याला विजेचा धक्का लागून तो जागीच बेशुद्ध पडला. हा विजेचा धक्का घराबाहेरील लोखंडी जिन्या शेजारी असलेल्या विद्युत वाहिन्यांच्या बिघाडामुळे झाला असल्याचा अंदाज तेथील नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. अलोकला विजेचा धक्का लागताच त्याला ठाणे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. हा विजेचा धक्का नक्की कसा लागला याचा तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.