ठाणे : ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत २४४ उमेदवार निवडणूक लढवित होते. या उमेदवारांपैकी ११७ उमेदवारांना पाचशेहून कमी मते मिळाली आहेत. यापैकी अंबरनाथ मतदारसंघातील १७ उमेदवार आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघातील १६ उमेदवारांना ५०० हून कमी मते मिळाली. अंबरनाथमध्ये २२ तर कल्याण पश्चिम मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवित होते. तर जिल्ह्यात एक हजाराहून कमी मते मिळालेले उमेदवार ३० इतके आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात २४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह मनसे, एमआयएम, बसपा, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर संघटना आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. परंतु जिल्ह्यातील ११७ उमेदवारांना पाचशे मतांची संख्या देखील पार करता आली नाही. यातही काही उमेदवारांना १०० हून कमी मतदान झाले आहे. तर ३० उमेदवारांना ५०१ ते एक हजार इतके मतदान झाले आहे.

आणखी वाचा-वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते, फुले रोड एक दिशा मार्ग

अंबरनाथ मतदारसंघातील २२ पैकी १७ उमेदवारांना ५०० पेक्षा कमी मतदान झाले आहे. तसेच कल्याण पश्चिम मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवित होते. यातील १६ जणांना पाचशे किंवा त्यापेक्षा कमी मतदान झाले आहे. मिरा-भाईंदर मतदारसंघातही ११ आणि उल्हासनगर मतदारसंघातील १० उमेदवारांना पाचशेहून कमी मतदान झाले आहे.

मतदारसंघ – ५०० किंवा त्यापेक्षा कमी मतदान

  • ठाणे – १
  • कोपरी -पाचपाखाडी – ६
  • ओवळा माजिवडा- ७
  • मुंब्रा- कळवा – २
  • भिवंडी पूर्व – ६
  • भिवंडी पश्चिम – ९
  • भिवंडी ग्रामीण – ०
  • कल्याण पूर्व – ८
  • कल्याण पश्चिम – १६
  • कल्याण ग्रामीण – ६
  • डोंबिवली – ४
  • अंबरनाथ – १७
  • उल्हासनगर – १०
  • मुरबाड – २
  • शहापूर – १
  • मिरा भाईंदर – ११
  • बेलापूर – ३
  • ऐरोली – ८
  • एकूण – ११७
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 117 candidates got less than 500 votes in the assembly elections in thane district mrj