कल्याण येथील न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीतील अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करुन १९ जणांनी विमा कंपनीची १४ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सन २०१८ ते २०१९ या कालावधीत न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीच्या मुरबाड रस्त्यावरील गुरुगोविंद निवास संकुलातील कार्यालयात हा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणी न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीचे व्यवस्थापक सतिश संभाजी भगत यांनी १९ फसवणूदारांविरु्ध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

हेही वाचा >>>ठाणे पूर्व स्थानकाजवळील पदपथावर बेकायदा लोखंडी शेड

१९ जणांनी विमा कंपनी्च्या अधिकाऱ्यांना विमा दाव्यासंदर्भात खोटी माहिती दिली. अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन १४ लाख ६९ हजार रुपयांचे विमा दावे मंजूर करुन घेतले. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आणला. पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 lakh fraud of insurance company in kalyan amy