कल्याण- मध्य रेल्वेच्या इगतपुरी ते टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एका तरूणाने आपल्या १५ वर्षांच्या मैत्रिणीचे टिटवाळा येथे सिग्नलला एक्स्प्रेस थांबली असताना अपहरण केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत सोनावणे असे गुन्हा दाखल तरूणाचे नाव आहे. अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी डोंबिवलीत शेलार नाका भागात आपल्या कुटुंबीयांसह राहते. या मुलीचे एका तरूणा बरोबर प्रेमसंबंध आहेत. दिवाळी सणाच्या काळात ही तरूणी इगतपुरी येथील आपल्या नातेवाईकांकडे पाहुणी म्हणून गेली होती. १२ नोव्हेंबर रोजी या तरूणीने डोंबिवलीत कुटुंबीयांना फोन करून मी पुष्पक एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानकात येते. तेथून लोकलने डोंबिवलीत येत आहे अशी माहिती दिली. कुटुंबीय तिची वाट पाहत होते.

Pune, Central Railway, New Rooftop Solar Plant on Diesel Loco Shed Ghorpadi, Rooftop Solar Plant, Save Rs 52 Lakh Annually, solar plant, central railway, pune, pune news,
रेल्वे वाचविणार वर्षाला ५२ लाख रुपये! विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी ‘अपारंपरिक’ पर्याय
Vande Bharat express canceled
पावसाळ्यात मुंबई-गोवा वंदे भारतच्या १२४ फेऱ्या रद्द, अतिरिक्त रेक अभावी वंदे भारतच्या फेऱ्या रद्द
1.39 crore fine recovered in 13 days from ticket inspection
मध्य रेल्वे मालामाल! तिकीट तपासणीतून १३ दिवसांत १.३९ कोटींचा दंड वसूल
Mumbai JCB driver damage railway cable
मुंबई: जेसीबी चालकाकडून रेल्वे केबलचे नुकसान, दीड लाखांची भरपाई
western railway services between virar to dahanu disrupted due to locomotive failure of goods train
पश्चिम रेल्वेची विरार- डहाणू सेवा विस्कळीत; विरारच्या नारंगी फाटकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
first test on platform number five of Thane station was successful
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील पहिली चाचणी यशस्वी
central railway cancelled 534 train due to mega block
सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेप्रवाशांची कसोटी; ‘महाब्लॉक’मुळे आज ५३४ फेऱ्या रद्द
Bus option of NMMT ST to reach office mumbai
कार्यालय गाठण्यासाठी एनएमएमटी, एसटीच्या बसचा पर्याय; बसमध्ये प्रवाशांची गर्दी

हेही वाचा- खळबळजनक: दोघांचं एकाच तरुणीवर जडलं प्रेम, बड्या उद्योजकाच्या मुलाने मित्राची केली हत्या

पुष्पक एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात येऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दोन तास उलटले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. इगतपुरीच्या नातेवाईकांनी मुलगी पुष्पक एक्स्प्रेसने कल्याणला गेल्याचे कळविले. यामुळे कुटुंबीय घाबरले. रात्री ११ वाजले तरी मुलगी घरी आली नाही. तिचा मोबाईल बंद येत होता. मुलीच्या वडिलांनी तिच्या एका मैत्रिणीला संपर्क साधला. त्यावेळी तिने सांगितले, टिटवाळा येथे एक्स्प्रेसला सिग्नलमुळे थांबा मिळाला. त्या थांब्यावर मुलगी उतरली. तेथून ती रेल्वे मार्गातून चालत जाऊन मित्र प्रशांत सोनावणे सोबत गेली असल्याचे सांगितले. ती टिटवाळा भागात देवदर्शन किंवा तेथे फिरून घरी येईल, असे कुटुंबीयांना वाटले. त्यानंतर चार दिवस झाले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून काळजीत पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुरुवारी अपहरणाची तक्रार केली. प्रशांतने तिचे अपहरण केल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा- लोखंडी साखळीने हातपाय बांधले अन्…; विदेशी तरुणीला भारतात भेटायला बोलावून केला रक्तरंजित शेवट

लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले, एका १५ वर्षाच्या मुलीचे टिटवाळ्याजवळून तिच्या मित्राने अपहरण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी विशेष पथके स्थापन करून तपास सुरू केला आहे.