ठाणे : ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून राज्य सरकारने रस्ते नुतनीकरणासाठी दिलेल्या २१४ कोटींच्या निधीतून १२७ रस्त्यांची कामे सुरू असतानाच, त्यापाठोपाठ राज्य शासनाने आणखी १५७ रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी ३९१ कोटी रुपयांचा निधी पालिकेला देऊ केला आहे. या कामांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रीया आठवडाभरात अंतिम करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील आणखी १५७ रस्त्यांचे लवकरच नुतनीकरण होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिकेतील रस्त्यांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. पावसाळ्यात खड्डे बुजविण्याची कामेही केली जातात. परंतु, काही दिवसांतच बुजवलेले खड्डे उखडतात. काही रस्त्यांची अक्षरश: चाळण होते. खराब रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडी या समस्यमुळे नागरिक हैराण होतात. गेल्यावर्षीही हेच चित्र दिसून आले. ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिकेकडून रस्ते कामांची आखणी करण्यात येत होती. परंतु, या कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. करोना काळात उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पालिका प्रशासनाकडे रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध नव्हता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे शहरातील रस्ते नुतनीकरणासाठी २१४ कोटींचा निधी देऊ केला होता. या निधीतून शहरातील १२७ रस्त्यांची कामे सुरू आहेत.

traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
FIIs invest Rs 85000 cr in equity market
परकीय विक्रेत्यांपेक्षा देशांतर्गत खरेदीदारांचा बाजारात जोर; ‘एफआयआय’ची ८५,००० कोटींच्या समभाग विक्री, तर ‘डीआयआय’कडून १ लाख कोटींची खरेदी
250 kg of firecrackers seized in action against firecrackers sellers without license
रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, २५० किलो फटाके जप्त
Pimpri, Pimpri property under tax, Pimpri latest news,
पिंपरी : अडीच लाख मालमत्ता कर कक्षेत, ३०० कोटींचा महसूल वाढणार
Cotton production reduced due to rains Mumbai news
अति पावसामुळे कापूस उत्पादनात घट; सात टक्क्यांनी घट होण्याचा सीएआयचा अंदाज
An amount of 4 crore 33 lakh crores was seized in Talasari police station limits
तलासरी पोलीस ठाणे हद्दीत ४ कोटी ३३ लाख कोटींची रक्कम जप्त

हेही वाचा – म्हाडा लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ; खोणी आणि शीरढोणच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा

यूटीडब्लूडी, बीटूमेन (डांबर) आणि काँक्रीट अशा तीन प्रकारे रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. ही कामे वेगाने सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील रस्ते नुतनीकरणासाठी आणखी ३९१ कोटींचा निधी पालिकेला देऊ केला आहे. या निधीतून शहरातील १५७ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, कोपरी, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील रस्ते कामांचा समावेश आहे. या कामांच्या निविदा प्रशासनाने काढल्या आहेत. या निवदेतून ठेकेदार निवड करून कामांचे कार्यादेश देण्याची प्रक्रीया शिल्लक आहे. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असून, यामुळे लवकरच ही कामे सुरू होणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

मे महिनाअखेर कामे उरकण्याचे नियोजन

ठाणे महापालिका क्षेत्रात २१४ कोटींच्या निधीतून १२७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यातच या कामांचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले होते. परंतु, पावसामुळे ही कामे सुरू होऊ शकली नव्हती. ऑक्टोबर महिन्यात या कामांना सुरुवात झाली असून, ही कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन पालिका प्रशानसाकडून आखले जात आहे.

हेही वाचा – राज ठाकरे उद्या ठाण्यात; मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरातील दुसरा दौरा

रस्ते कामांचा दर्जा सुधारणार का?

राज्य सरकारने दिलेल्या निधीतून ठाणे शहरात १२७ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे सुरू असून या कामांच्या दर्जाविषयी सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कामांच्या पाहाणीनंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी काही ठेकेदारांना नोटीसा बजावल्या आहेत. आता शहरातील आणखी १५७ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे सुरू होणार असून, ही कामे दर्जात्मक करण्याचे आव्हान आयुक्त बांगर यांच्यापुढे राहणार आहे.