समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. बुलढाण्यात झालेल्या अपघाताला एक महिना उलटत नाही तोवर समृद्धीवर दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १६ जणांचे प्राण गेले आहेत. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरंळाबे येथे क्रेन आणि स्लॅब कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघाताची दखल राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

हेही वाचा >> Samruddhi Highway: शहापूर इथे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असतांना क्रेन कोसळून १६ कामगार ठार

Shaktipeeth Highway, Mahayuti , Mahavikas Aghadi, cancellation of Shaktipeeth Highway,
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या अधिसूचनेनंतर महायुती – ‘मविआ’त राजकीय शह – काटशह
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Hasan Mushrif announcement regarding Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्ग रद्द; हसन मुश्रीफ यांची घोषणा
Two youths died in accident on Nagar Solapur highway near Mahijalgaon bypass in Karjat taluka
अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर माहीजळगाव येथे भीषण अपघातात दोन युवक ठार
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
खेड शिवापूर टोलनाका परिसरात मोटारीतून कोट्यवधी रुपये जप्त
hit and run case
नागपुरात आणखी एक ‘हिट अँड रन’, पहाटे घडला थरार…
customs superintendent killed and two others injured when they collided with illegally parked tempo
रस्त्यात टेम्पो पार्किंग जीवावर बेतले, अपघातात एक ठार 

“शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत ३ कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असं ट्वीट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

“शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो”, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम जोरात सुरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजतं आहे. शहापूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री ११ च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा मृत्यू झालाय.

हेही वाचा >> शंभर फुटांवरून क्रेन मजुरांवर कोसळली अन्…, अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.