ठाणे जिल्ह्यातील १६ बालकांना एकाच वेळी कायदेशीररित्या पालक मिळाले. विशेष म्हणजे मुली दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. दत्तक मुलांमध्ये ११ मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी हा अनौपचारिक कार्यक्रम पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कल्याणमध्ये शाळकरी बालकाची हत्या

बालकल्याण समिती ठाणे यांच्या आदेशानुसार या दोन्ही संस्थांमध्ये अनाथ, सोडून दिलेले व परित्यागीत बालकांना दाखल करण्यात येते. कारा (केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण) या संकेतस्थळावर दत्तक इच्छुक पालक नोंदणी करून ‘कारा’ ने दाखविलेले मुलगा किंवा मुलीला पालकांनी राखीव केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांची मुलाखत घेऊन दत्तक आदेश करीता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात येतो.

हेही वाचा- ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच रस्ता अडवून मंडपची उभारणी

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार अनाथ, सोडून दिलेले आणि परित्यागीत बालकांचे दत्तक आदेश तसेच नात्यांतर्गत दत्तक आणि सावत्र दत्तक करण्याकरीता दत्तक नियमावली २०२२ तयार करण्यात आली. त्यानुसार सदर आदेश पारीत करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी दत्तक आदेश न्यायालयामार्फत केले जात होते. शासनाने ही जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी करून इच्छुक पालकांकडे दत्तक बालके जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या आदेशाने देण्यात आले. यावेळी दत्तक घेतलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट आणि डोंबिवली येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक संस्थांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे, नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट दत्तक संस्थेच्या बेट्टी मथाई आणि डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट वंदना पाटील उपस्थित होते.

हेही वाचा- ठाणे : करोना ओसरल्यानंतरही नोंदणीपद्धतीने विवाहाला पसंती

अनाथ, सोडून दिलेले आणि परित्यागित बालकांना पालक मिळणे आणि याचा आनंद हा त्या बालकांच्या चेहऱ्यावर पाहणे क्षण आगळावेगळा आहे. हे मानवतेचे काम माझ्या सहीने होत आहे, हा माझ्या जीवनातील अनोखा क्षण असल्याची भावना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी व्यक्त केली.
तीन बालके जाणार परदेशात मंगळवारी आदेश दिलेल्यांमधील दोन मुली या अमेरिकेतील पालकांकडे तर एक मुलगा हा इटलीतील पालकांकडे जाणार आहे. तर महाराष्ट्रात सात, ओरिसा, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, गुजरात या राज्यात प्रत्येकी एका पालकांकडे ही बालके दत्तक गेली आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 orphaned children of thane district got parents dpj