कल्याण पश्चिम विभागात ॲल्युमिनियम फ्रेम कोटींग (अनोडायझिंग) करणाऱ्या औद्योगिक ग्राहकाकडील १७ लाख रुपयांची वीज चोरी महावितरणच्या विशेष पथकाने उघडकीला आणली आहे. हा औद्योगिक ग्राहक गेल्या वर्षभरापासून दूर नियंत्रणाद्वारे मीटरचा दर्शनी भाग बंद करुन वीजचोरी करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याला ४ लाख ८० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम न भरल्याने या औद्योगिक ग्राहकासह वीज वापरकर्त्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- डोंबिवली, कल्याणमध्ये दुचाकी चोरणारा सराईत चोरटा अटकेत; चोरीमध्ये अल्पवयीन मुलाचा सहभाग

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक

जुमीन निजामुद्दीन जलाल (औद्योगिक ग्राहक) आणि मोहम्मद फैजल फारुकी (वापरकर्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महावितरणच्या भरारी पथक व स्थानिक अधिकाऱ्याच्या चमुने कल्याण पश्चिमेतील खाडी किनारा, रेतीबंदर येथील मोहमदिया इंग्लिश शाळेसमोरील अनोडायझिंग कारखान्याच्या मीटरची पहाटेच्या सुमारास तपासणी केली.

हेही वाचा- ठाणे: टिटवाळ्यात शिक्षिकेच्या घरात चोरी

संबंधित ग्राहक मीटरमध्ये फेरफार करत न्युट्रल नियंत्रित करून विजेचा चोरटा वापर करत असल्याचे तपासणीत आढळून आले. वीज वापर माहितीच्या विश्लेषणातून रात्रीच्या वेळी हा ग्राहक मीटरचा दर्शनी भाग बंद करून वीजचोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. सहजपणे लक्षात येणार नाही अशा रितीने त्याने वीज चोरीसाठीची यंत्रणा उभारली होती. या ग्राहकाने ऑक्टोबर २०२१ पासून १७ लाख ८ हजार रुपये किंमतीची ९५ हजार २२९ युनिट वीज चोरुन वापरल्याचे आढळून आले.

हेही वाचा- गुंड गणेश जाधव हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ प्रमाणे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरिक्षक लक्ष्मण गायकवाड या गुन्ह्याचा तपास करत आहेत. कल्याण पश्चिम उपविभाग दोनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता माणिक गवळी, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक जनार्दन जाधव यांच्या सहकार्याने भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते, सहायक अभियंता अतुल ओहोळ, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी राकेश कुथे, वरिष्ठ तंत्रज्ञ अरुणा नागरे, प्रदीप फराड, विद्युत सहायक प्रफुल्ल राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader