किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील एकूण ११७ स्थानकांवर मोठय़ा प्रमाणात मोबाइल, पाकीट चोरीच्या घटना घडतात. मात्र, या घटनांच्या तक्रारी नोंदवण्याची सोय केवळ १७ स्थानकांवर असल्यामुळे तेथील रेल्वे पोलीस ठाण्यांबाहेर तक्रारदार प्रवाशांच्या दररोज रांगा लागतात. 

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त असतानाही प्रवाशांचे मोबाइल, पाकिटे चोरण्याचे प्रकार सुरू आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्यांची हद्द मध्य आणि हार्बर मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, कर्जत, कसारा तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत आहे. या भागात एकूण ११७ रेल्वे स्थानके आहेत. त्यातील केवळ १७ स्थानकांवर पोलीस ठाणे उपलब्ध आहेत. या सर्वच ठिकाणी महिन्याला सरासरी नऊशे ते एक हजार गुन्हे दाखल होत आहेत. त्यापैकी ९० ते ९५ टक्के गुन्हे मोबाइल चोरीचे असतात. तर, उर्वरित गुन्ह्यांमध्ये पाकीट चोरी किंवा इतर प्रकरणांचा समावेश आहे. 

हेही वाचा >>> निळजे स्थानकात प्रवाशांकडून तोडफोड

मध्य रेल्वे मार्गावर दादर, कुर्ला, कल्याण आणि ठाणे हे सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून याठिकाणी पोलीस ठाणे आहेत. यातील कल्याण रेल्वे पोलीस हद्दीमध्ये १४ रेल्वे स्थानके येतात. दादरमध्ये सहा, कुर्ला येथे आठ, ठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच रेल्वे स्थानकांचा सामावेश आहे.

दरम्यान, कसारा येथे मोबाइल चोरी गेल्यास तक्रारदाराला कल्याण स्थानकात यावे लागते. त्यासाठी त्याला एक तासाचा प्रवास करावा लागतो. शिवाय, तक्रार नोंदविण्यासाठी गर्दी असल्याने पोलीस ठाण्याबाहेर रांगेतही उभे राहावे लागते. असाच प्रकार दादर, कुर्ला, कल्याण आणि ठाणे याठिकाणीही दिसून येतो.

आर्थिक भुर्दंड 

मोबाइल चोरीनंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच नवीन सिमकार्ड घेण्यासाठी चोरीची तक्रार करणे आवश्यक असते. तसेच पाकिटामध्येही एटीएम. ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना तसेच इतर महत्त्वाची कार्ड असतात. हे चोरीला गेल्यावर ते नवीन मिळविण्यासाठी तक्रारपत्र आवश्यक असते. यामुळे पाकीट किंवा मोबाइल चोरीनंतर अनेक प्रवासी लांबचा प्रवास करत संबंधित स्थानकाबाहेर रांग लावून तक्रारी नोंदवतात. यामुळे शारीरीक, मानसिक त्रासाबरोबरच त्यांचा वेळही वाया जातो.

पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीसंदर्भात गुन्हे दाखल होतात, परंतु त्यांची उकल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि एलटीटी या चार नव्या पोलीस ठाण्याच्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर झाला आहे. त्यामुळे भविष्यात चार नवी पोलीस ठाणी उपलब्ध होतील.

– डॉ. रवींद्र शिसवे, आयुक्त, मुंबई रेल्वे पोलीस