शहापूर : मध्य रेल्वेच्या वासिंद-आसनगाव स्थानकादरम्यान असलेल्या वेहळोली रेल्वे फाटकाजवळ मंगळवारी सायंकाळी उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आकांक्षा दीपक जगताप असे मृत तरुणीचे नाव असून ती डोंबिवली येथे राहणारी आहे.

अपघाताची माहिती मिळताच तिला तातडीने शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आकांक्षा तिच्या आई-वडिलांसोबत मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती.

तिचे आईवडील डोंबिवली स्थानकावर उतरले मात्र, आकांक्षा पुढे निघून आली. आसनगाव रेल्वेगाडीने येत असताना वासिंद – आसनगाव स्थानकादरम्यान वेहळोली रेल्वे फाटकाजवळ मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ती रेल्वे डब्यातून खाली पडली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

Story img Loader