ठाण्यात दुचाकी जाळण्याचं सत्र सुरूच असून पाचपाखाडी परिसरात अज्ञातांनी 18 दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काहीसं भीतीचं वातावरण आहे.
Thane: 18 motorcycles were gutted in a fire in Panchpakhadi last night. Police are investigating the reason behind the fire. #Maharashtra pic.twitter.com/A37HQyJKzE
— ANI (@ANI) December 25, 2018
सोमवारी रात्रीच्या सुमारास पाचपाखाडी भागातील हनुमान सोसायटी परिसरात या दुचाकी जाळण्यात आल्या. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. गाड्या जाळण्यामागे अज्ञातांचा नेमका काय हेतू असेल याचाही पोलीस आता तपास करत आहेत. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी पाचपाखाडी भागातच 9 दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या सायन आणि भिवंडीतही गाड्या जाळण्याचा प्रकार घडला होता. याशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वारंवार गाड्या जाळण्याच्या घटना घडत आहेत.