पर्यटनासाठी दुबईला घेऊन जातो असे सांगून बदलापूरमधील एका पर्यटन कंपनीने १८ पर्यटकांची आणि कल्याणमधील पर्यटन कंपनीची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकूण १८ पर्यटकांकडून प्रवासाचे पैसे घेऊन त्यांची १३ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा- उल्हासनगर पालिकेत कोणतीही भरती नाही, बनावट संदेशांमुळे पालिका प्रशासनाला जाहिरात देण्याची वेळ

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

गुगोल ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक अजय अवटे (रा. बळीराम सोसायटी, खडकपाडा, कल्याण) यांनी या फसवणूक प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आशीष ठवले, सपना ठवले (रा. सविता सदन, रमेशवाडी चर्च रस्ता, बदलापूर) या अर्निका टुर्स कंपनीच्या संचालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- “…अन्यथा शिंदे गट आणि पोलीस जबाबदार असतील”, ठाण्यात शाखांवरून ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद उफाळला

पोलिसांनी सांगितले, दीपक वानखेडे हे विदेशी पर्यटन यात्रा काढतात. तक्रारदार अजय अवटे यांचे ते मित्र आहेत. वानखेडे यांच्या कल्याण परिसरातील १८ नागरिकांच्या गटाने दुबईला जाण्यासाठी मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये विचारणा केली होती. वानखेडे ही पर्यटन यात्रा काढण्यास इच्छुक नसल्याने त्यांनी कल्याणमधील आपले गुगोल ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक अजय अवटे यांना दुबई पर्यटनाविषयी विचारणा केली होती. अवटे यांनी आपण स्वत: नाही, पण आपला बदलापूरमधील एक परिचित अर्निका ट्रव्हॅल्सचे आशिष ठवले हे दुबई पर्यटन यात्रा काढतात, असे वानखेडे यांना सांगितले.

१८ जणांच्या दुबई पर्यटना विषयी अवटे यांनी बदलापूरचे ठवले यांना सांगितले. ठवले यांनी दुबईला १८ जणांचा गट पर्यटनासाठी नेण्याचे कबुल केले. गेल्या वर्षी ८ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. या १८ जणांचे दुबई विमान तिकीट, व्हिसा या सर्व तयारीसाठी अवटे यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका करुन या प्रवाशांकडील प्रवासाचे १३ लाख १५ हजार रुपयांचे दीपक वानखेडे यांच्या पर्यटन कंपनीकडे जमा असलेली रक्कम आशीष ठवले, पत्नी सपना ठवले यांच्या बँक खात्यावर अवटे यांनी जमा केली.

हेही वाचा- “…अन्यथा शिंदे गट आणि पोलीस जबाबदार असतील”, ठाण्यात शाखांवरून ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद उफाळला

प्रवासाची तारीख जवळ आली तरी प्रवाशांची तिकीट मिळत नाहीत म्हणून अवटे यांनी बदलापूर येथे सपना ठवले यांची भेट घेतली. खोटी कारणे सांगून ते अवटे यांची दिशाभूल करत होते. अखेर ठवले यांनी किरकोळ कारण सांगून प्रवासाची तारीख आठ दिवस पुढे ढकलली. दुसरी प्रवासाची तारीख जवळ आल्यावरही तिकीट आणि व्हिसा ठवले दाम्पत्याने अवटे यांना दिले नाही. किरकोळ, खोटी कारणे सांगून ते वेळकाढूपणा करत असल्याचे अवटे यांच्या निदर्शनास आले. दुबई यात्रा रद्द झाली असल्याने प्रवासाचे पैसे परत करा असा वारंवार तगादा लावूनही ठवले दाम्पत्याने प्रतिसाद दिला नाही. ठवले दाम्पत्याने पर्यटक, आपली फसवणूक केली असल्याने अवटे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.