कल्याण – आपण शेअर्समध्ये ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक केली तर आपणास अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल, असे चार भामट्यांनी कल्याण मधील खडकपाडा भागातील आरटीओ परिसरात राहत असलेल्या एका ७० वर्षाच्या वृध्दाला सांंगितले. या वृध्दाकडून दोन महिन्यात भामट्यांनी १८ लाख ९० हजार रूपयांची रक्कम उकळून या वृध्दाला आकर्षक परतावा नाहीच, पण मूळ रक्कमही परत न करता फसवणूक केली आहे.प्रदीप सतीशचंद्र जैयस्वाल (७०, रा. संघवी रिजन्सी, आरटीओ कार्यालयाजवळ, कल्याण) असे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. नीलम भाटीया, अलोक चतुर्वेदी आणि इतर दोन जण अशी आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रदीप जैयस्वाल यांनी तक्रार केली आहे.पोलिसांंनी सांंगितले, मे महिन्यात तक्रारदार प्रदीप जैयस्वाल यांना आरोपी नीलम भाटीया या अनोळखी महिलेने जैयस्वाल यांच्या मोबाईलवरीव व्हाॅटसपवर एक लघुसंदेश पाठविला. त्यांना संपर्क करून आपण ऑनलाईन शेअऱ् व्यवहारातून गुंतवणूक केली तर आपणास आकर्षक मोबादला मिळेल. भाटीया यांनी जैयस्वाल यांना एक जुळणी पाठवली. ती जुळणी जैयस्वाल यांनी उघडून त्यात त्यांनी स्वताची व्यक्तिगत, बँक खात्यांची माहिती भरणा केली. ही माहिती भरल्यानंतर त्यानंतर त्यांना एचडीएफसी सिक्युरिज २० नावाचे उपयोजन दिसले. या उपयोजन माध्यमातून शेअर व्यवहार करण्यासाठी आपल्या नावाचे खाते उघडले असल्याचे प्रदीप यांना दिसले.

हेही वाचा >>>ठाण्यातील शाळा, महाविद्याल्यांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय

प्रदीप यांनी आपला गुप्त संकेतांंक टाकून त्यामधून गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत आरोपी सांगतिल त्याप्रमाणे रक्कम भरणा करून व्यवहार करू लागले. अशाप्रकारे दोन महिन्यात प्रदीप यांनी १८ लाख ९० हजार रूपये ऑनलाईन व्यवहारत गुंंतविले. या रकमेवर परतावा मिळण्यासाठी प्रदीप आरोपींना संपर्क करू लागले. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. परतावा मिळत नसेल तर मूळ रक्कम परत करा म्हणून प्रदीप तगादा लावू लागले. ती रक्कमही परत देण्यास आरोपी टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक आरोपी करत असल्याचे लक्षात आल्यावर प्रदीप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 lakh fraud of elderly in kalyan through share transaction amy
Show comments