गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवलीत उष्माघाताने दोन जणांचे बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंबिवलीत गोग्रासवाडीत राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह इमारतीच्या गच्चीवर आढळून आला. दोन दिवसापूर्वी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ एका तरूणाचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता. उष्माघाताने हे बळी गेल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
गोग्रासवाडीत राहणाऱ्या शुभांगी खंदारे (५५) या त्या राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मृतावस्थेत आढळून आल्या. याच इमारतीत राहणाऱ्या तरूण पेडणेकर याने ही माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूक्मिणीबाई रूग्णालयात पाठवला आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ वल्लीपीर रस्त्यालगत एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याची ओळख पटली नाही.
पोलिस या तरूणाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. उष्माघाताने हे मृत्यू झाले असण्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Story img Loader