ठाणे : बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, मंगळवारी ठाण्यात विमान कंपनीमध्ये काम करणाऱ्या २० वर्षीय मुलीचा तिघांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिडीत २० वर्षीय मुलगी ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास आहे. सोमवारी तिला कामावर सुट्टी असल्याने ती पाचपाखाडी येथील ठाण्यातील तिच्या मित्रांच्या घरी आली होती. सोमवारी रात्री ती मित्रांसोबत बाहेर जेवण्यासाठी गेली होती. एका मोटारीने ते परतत असताना त्यांच्या मोटारीचा धक्का पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला लागला. याबाबत तरुणी आणि त्यांच्या मित्रांनी माफी मागितली. परंतु त्या व्यक्तीने कोणाचेही ऐकले नाही.

हेही वाचा…Badlapur sexual abuse case: बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन पूर्वनियोजित; पोलिसांची माहिती

त्यानंतर काही वेळाने त्याचे आणखी दोन साथिदार त्या ठिकाणी आले. त्यांनी तरुणीसह तिच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी तरुणीचा विनयभंग झाला. घटनेनंतर तरुणी आणि तिच्या दोन मित्रांनी तात्काळ मोटारीचे दार लावून तेथून पळ काढला. तरुणीने मंगळवारी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.