पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निर्मूलनासाठी बदलापूर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून यासाठी लागणारी सर्व साधनसामग्री पालिकेत सज्ज ठेवण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या आदेशानुसार नगर परिषद कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज झाल्यानंतर एक मान्सूनपूर्व सरावदेखील पार पाडला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य धोक्यांशी सामना करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाल्याचा दावा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या सरावादरम्यान केला आहे. कुळगांव-बदलापूर नगर परिषदेचा अग्निशमन दलाचा विभाग आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून या विभागाच्या वतीने बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज धरणात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने मान्सूनपूर्व सराव शिबिराचे आयोजन केले होते. त्यात आपत्ती निर्मूलनाची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली होती.
बदलापूर शहराच्या हद्दीतून उल्हास नदी व विविध भागांतून नाले जात असून पावसाळ्यात हे नाले तुंबल्याने पाणी साठून पूर परिस्थिती ओढावते. हे पाणी जवळील नागरिकांच्या घरात हमखास शिरते. शहरातील हेंद्रेपाडा, शनिनगर, शिरगांव, कात्रप, बॅरेज परिसर, रेल्वे स्थानकाजवळील नाला, मोहनानंद नगर आदी भागांत असले प्रकार घडतात. तसेच उल्हास नदीचे पाणी वाढल्यानेही पूरसदृश परिस्थिती ओढावते. या पाश्र्वभूमीवर पालिकेने नालेसफाईचा दावा केला आहे, तो आता कितपत खरा अथवा खोटा हे नाले तुंबल्यावरच कळणार आहे. तसेच या व्यतिरिक्त शहरात झाडे कोसळणे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने होणारे गंभीर अपघात शहरात पावसाळ्याच्या काळात घडत असतात. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिकेच्या आपत्ती निर्मूलन विभागाकडे दोन इंजिनच्या बोटी, १ रबर बोट त्याशिवाय ३५ लाइफ जॅकेट, २० एअर टय़ूब, १५ लाइफ रिंग, झाडे कापण्याची दोन यंत्रे, तसेच दोरखंड व बचावासाठी लागणारे इतर साहित्य आदींचा साठा करण्यात आला आहे.
बदलापूरमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष
पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निर्मूलनासाठी बदलापूर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून यासाठी लागणारी सर्व साधनसामग्री पालिकेत सज्ज ठेवण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-06-2015 at 12:13 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 hour control room in badlapur