लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्ववाहिनी देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (ता.१८) रात्री १२ आणि शुक्रवारी (ता. १८) रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर, तळोजा औद्योगिक क्षेत्र, लगतच्या ग्रामपंचायंतींचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
आणखी वाचा-मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
एमआयडीसीच्या बारवी धरणातून आणि जांभूळ जलशुध्दिकरण केंद्रातून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई शहरांना, औद्योगिक विभागाला दररोज पाणी पुरवठा केला जातो. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या कालावधीत बारवी गुरुत्व वाहिनी आणि जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या दुरुस्तीच्या कालावधीत गुरुत्व वाहिनी आणि शुध्दीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांमधून संबंधित शहरांना होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिक, उद्योजकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीतर्फे करण्यात आले आहे.