कल्याण : कल्याण पश्चिमेत राहत असलेल्या एका चोवीस वर्षाच्या हवाई सुंदरीची ऑनलाईन व्यवहारात अनोळखी व्यक्तिने नऊ लाख ९३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडलेल्या फसवणूक प्रकरणाची महिलेने गुरुवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या महिलेने पोलीस पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण २३ नोव्हेंंबर २०२४ रोजी घरी असताना संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तिचा आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर फोन आला. ‘तुम्ही जे पार्सल इराणला पाठविले होते. ते अद्याप तेथे पोहचलेले नाही,’ असे त्याने आपणास सांगितले. त्यावेळी आपण तात्काळ त्या इसमास ‘ते पार्सल आपण पाठविलेले नाही,’ असे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतरही संबंधित इसमाने स्काईप उपयोजन महिलेला आपल्या मोबाईलवर स्थापित करण्यास सांगितले. त्यानंतर एक जुळणी महिलेला पाठवली. ही जुळणी पाठविल्यानंतर अज्ञात इसमाने कल्याणमधील महिलेला दृश्यध्वनी चित्रफितीद्वारे संपर्क साधला. तक्रारदार महिलेला तुमचे नाव एका आर्थिक घोटाळा प्रकरणात आले आहे, अशी भीती घातली. आपण कोणतेही कसले व्यवहार केले नाहीत तरी आपले नाव कोणत्या आर्थिक गैरव्यवहारात आले आहे, असा प्रश्न महिलेला पडला. या महिलेला अज्ञाताने बोलण्यात गुंतवले. त्यांना मोबाईलमधील आयसीआयसीआय बँकेचे उपयोजन स्थापित करून उघडण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात अज्ञात इसम महिलेला कसलाही संशय येऊ नये त्यांच्याशी म्हणून बोलत राहिला. या बोलण्याच्या काळात अज्ञाताने महिलेच्या बँक खात्यावर दहा लाख रूपयांचे व्यक्तिगत कर्ज मंजूर करून घेतले.

हेही वाचा…विशाल गवळीने मोबाईल विकला होता शेगावच्या लाॅज मालकाला, १८ जानेवारीपर्यंत विशाल, साक्षी गवळीला न्यायालयीन कोठडी

हे तुमच्या खात्यावर असलेले पैसे हे आर्थिक घोटाळ्यातील आहेत, अशी भीती अज्ञाताने महिलेला घातली. है पैसे आर्थिक घोटाळ्यातील असल्याने अज्ञाताने ती १० लाखाची रक्कम युको बँकेच्या एका बँक खात्यावर महिलेला पाठविण्यास सांगितली. या सर्व प्रक्रिया अज्ञाताने महिलेला काही समजण्याच्या आत करून घेतल्या. या सर्व व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी विजय नाईक यांनी सांगितले, या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 year old air hostess in kalyan west cheated of 9 93000 in online fraud