विना हेल्मेटप्रकरणी ८४४ तर, ट्रीपल सीटप्रकरणी ३८१ जणांवर कारवाई

ठाणे : होळी आणि धुळवंदनच्या दिवशी मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्या २४० मद्यपी चालकांची ठाणे वाहतूक पोलिसांनी झिंग उतरवली असून त्याचबरोबर त्यांच्यासोबत दुचाकींवर मद्याच्या नशेत पाठीमागे बसलेल्या २६ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. याशिवाय, विना हेल्मेटप्रकरणी ८४४ तर, ट्रीपल सीटप्रकरणी ३८१ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे.

होळी आणि धुळवंदनच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. मद्याच्या नशेत वाहने चालवितात आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. असे संभाव्य अपघात रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून दरवर्षी होळी आणि धुळीवंदनच्या दिवशी शहरात विशेष मोहिम राबविण्यात येते. यात श्वास विश्लेषक यंत्राद्वारे चालकांची तपासणी करण्यात येते. या तपासणीत मद्यपान केल्याचे आढळून आले तर, संबंधित चालकावर पोलिस कारवाई करतात. अशाचप्रकारे यंदाच्या वर्षीही पोलिसांनी कारवाई केली.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांचा भाग येतो. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी ठाणे वाहतुक पोलिसांनी ठिकठिकाणी पथके तैनात केली होती. ही पथकाने श्वास विश्लेषक यंत्राद्वारे चालकांची तपासणी करीत होती.

धुलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ८९ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या आकड्यामध्ये मोठी वाढ झाली. ठाणे पोलिस आयुक्तालयात एकूण २४० मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर दुचाकींवर मद्याच्या नशेत पाठीमागे बसलेल्या २६ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे. सर्वाधिक कारवाई वागळे आणि कल्याण परिमंडळात झाली आहे. याशिवाय, विना हेल्मेटप्रकरणी ८४४ तर, ट्रीपल सीटप्रकरणी ३८१ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईची आकडेवारी

परिमंडळ             मद्यपी चालक पाठीमागे बसलेला व्यक्ती

ठाणे                        ३०                         ४

भिवंडी                     ४०                        ११

कल्याण                  ५२                         ४

उल्हासनगर            ६६                         ५

वागळे                    ५२                         २

एकूण                    २४०                     २६

Story img Loader