२७ गावांतील रस्त्यांचा विकास; ‘कल्याण शीळ’वरील कोंडीही सुटणार

बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्य़ातील स्थानक असलेले म्हातार्डी ठाणे तसेच कल्याण, डोंबिवलीशी प्रशस्त रस्त्यांनी जोडले जावे यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या प्रकल्पांना एमएमआरडीएने तत्त्वत मंजुरी दिली आहे. गुरुवारी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत २७ गावे व कडोंमपातील रस्ते रुंदीकरण, बांधणीवरही एकमत झाल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकारांना दिली.

मुंबई-अहमदाबाद ही बुलेट रेल्वे ठाणे जिल्ह्य़ातून जाणार आहे. ठाणे खाडीखालून नवी मुंबईमार्गे भुयारी मार्गातून जाणारी ही रेल्वे महापे-शीळमार्गे दिवा-म्हातार्डी येथून मार्गस्थ होणार आहे. म्हातार्डी येथे या मार्गावर स्थानक उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दिवा-पनवेल अशी रेल्वेसेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या नियोजन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून दिवा, आगासन, म्हातार्डी तसेच आसपासच्या विभागातील रस्त्यांची बांधणी आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. यासंबंधीचा सविस्तर आराखडा गुरुवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त

वाहतूक नियोजनास हातभार

* म्हातार्डी ते आगासन आणि आगासन ते शीळ रस्त्याच्या कामांमुळे दिवा विभाग कल्याण शिळ रस्त्याने जोडला जाईल आणि कल्याण फाटा तसेच शीळ फाटा जंक्शनवरील रहदारीचा ताण कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे. या रस्त्याचे सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे.

*  या रस्त्याची हद्द कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपर्यंत विस्तारली जावी, हा महापालिकेचा आग्रह देखील एमएमआरडीएने तत्त्वत मान्य केला आहे.

*  ढोबळ अंदाजपत्रकानुसार या रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटी रुपयांची आवश्यकता असून २७ गावांमधील रस्त्यांची कामे एमएमआरडीएने केल्यास या भागातील नियोजनलाही हातभार लागणार आहे. हा रस्त्याचा प्रकल्प अहवाल एमएमआरडीएकडे पाठविला जाईल, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

Story img Loader