येथील फेज तीनमध्ये साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या करिना राजानी (३८) या महिलेची एका भामटय़ाने एक लाख ३४ हजारांची फसवणूक केली. वर्षभरापूर्वी रमेश खेमचंदानी याने घर देण्याच्या बहाण्याने करिना यांच्याकडून एक लाख ३४ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने घेतले. परंतु घरही दिले नाही आणि दागिनेही परत केले नाही. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

३२ लाखांची फसवणूक
पश्चिमेतील आनंदनगर परिसरात राहणारे राजेंद्र नेगी आणि अन्य ग्राहकांकडून विकासकाने घरच्या नोंदणीसाठी पैसे घेऊन त्यांची ३२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आनंदनगर येथील क्रिस कॉर्नर प्लाझा येथे घर घेण्यासाठी विकासक अमित अरुण अंबुर्ले आणि त्याचे सहकारी अश्विनी सुतार, आदिती अभ्यंकर, सुरेश भोसले यांनी घराच्या नोंदणीसाठी नेगी आणि अन्य ग्राहकांकडून ३२ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र बांधकामही सुरू केले नाही आणि पैसेही परत केले नाहीत. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Story img Loader