ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र थांबता थांबत नसून गेल्या चोवीस तासात शहरात तब्बल ३२ वृक्ष उन्मळून पडले आहेत. १३ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत तर ९ झाडे धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नसले तरी यामुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच वृक्ष उन्मळून पडल्यानंतर त्याचे पुनर्रोपण करणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असून यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिनाभरात संपूर्ण शहरात शंभरहून अधिक वृक्ष उन्मळून पडले –

ठाणे शहरात यापूर्वी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक म्हणून घोषित केले होते. हे सर्व वृक्ष पालिकेने काढून टाकले होते. त्यानंतरही मुसळधार पावसादरम्यान शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभरात संपूर्ण शहरात शंभरहून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. संबधीत विभागाला उन्मळून पडलेली वृक्ष पाहणीदरम्यान धोकादायक असल्याचे दिसून आले नव्हते का आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी के उपयोजना केल्या, असे प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पुनर्रोपण शक्य असतानाही वृक्ष कापून टाकले – अभिनेता संतोष जुवेकरने व्यक्त केला संताप

अशा घटना नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती –

गेल्या चोवीस तासात शहरात तब्बल ३२ वृक्ष उन्मळून पडले आहेत. १३ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत तर ९ झाडे धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. रस्त्यालगतचे वृक्ष उन्मळून पडण्याचे किंवा फांद्या पडण्याच्या घटना सर्वाधिक आहेत. रस्त्यावर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अशा घटना नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 32 trees uprooted in last 24 hours in thane msr