१२ ढाबे, चार सव्र्हिस सेंटरवरही कारवाई
एमआयडीसीच्या वतीने शुक्रवारी पुन्हा चोरून पाणी वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३५० अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. याव्यतिरिक्त १२ ढाबे आणि चार सव्र्हिस सेंटर्सवर कारवाई करण्यात आली. मलंगगड ते टाटा पॉवर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
एकीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये भीषण पाणीटंचाई असताना दुसरीकडे मोठय़ा प्रमाणात पाणी चोरी होत असल्याचे दिसून येते. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा एकदा पाणी चोरी पूर्ववत होत असल्याचे गेल्या दोन महिन्यांत दिसून आले आहे. कारण नळजोडणी खंडित करण्याव्यतिरिक्त चोरांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. या अनधिकृत नळजोडण्यांद्वारे उपलब्ध होणारे पाणी अनधिकृत बांधकामे तसेच गॅरेजमध्ये गाडय़ा धुण्यासाठी वापरले जाते.
३५० अनधिकृत नळजोडण्या तोडल्या
एमआयडीसीच्या वतीने शुक्रवारी पुन्हा चोरून पाणी वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-05-2016 at 01:41 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 350 unauthorized tap connection breaks by midc