ठाणे : क्षयरोग उपचाराचा खर्च शासनाकडून केला जात असला तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या पोषण आहाराचा खर्च अनेक रुग्णांना करणे शक्य होत नसून अशा रुग्णांना दानशूर व्यक्तींकडून सलग सहा महिने दरमहा पोषक आहार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात निक्षय मित्र योजना राबविली जात आहे. या योजनाकरिता ठाणे शहरात आढळून आलेल्या ९ हजार रुग्णांपैकी ४१३८ रुग्णांनी निक्षय मित्रांची गरज असल्याचे पालिका प्रशासनाला कळविले आहे. त्यापैकी आतापर्यंत ४८० रुग्णांना निक्षय मित्र मिळाले असून उर्वरित ३६५८ रुग्ण निक्षय मित्रांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात क्षयरोग संशयित रुग्णांच्या मोफत चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमध्ये दरवर्षी सुमारे आठ ते नऊ रुग्ण आढळून येतात.
हेही वाचा >>> कल्याण पूर्वमध्ये १३ बंगले मालक वीजचोर ; ७९ लाखाची वीज चोरी उघड
यंदाही अशाचप्रकारे यंदाच्या वर्षीही शहरात नऊ हजार रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी केंद्र शासनाच्या धोरणानुसार ठाणे महापालिकेने पाऊले उचलली आहेत. पालिकेने करोना काळातही क्षयरोग रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू ठेवली होती. याशिवाय उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याची मोहीमही सुरु ठेवण्यात होती. या रुग्णांच्या उपचाराचा खर्च लाखांच्या घरात असून तो अनेक रुग्णांना परवडणारा नाही. त्यामुळे हा संपूर्ण खर्च महापालिका आरोग्य विभाग, केंद्र आणि राज्य सरकारमार्फत केला जातो.
हेही वाचा >>> ठाण्यातील महामार्गाच्या जबाबदारीचा चेंडू पालिकेने ढकलला एमएआरडीच्या कोर्टात
खासगी लॅबमध्येही या रुग्णांची मोफत तपासणी केली जाते. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडूनही निधी दिला जातो. उपचाराबरोबरच अशा रुग्णांना सहा महिने पोषण आहार घेणे गरजेचे असते. पण, त्याचाही खर्च अनेक रुग्णांना परवडणारा नसतो. त्यामुळे अशा रुग्णांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात निक्षय मित्र योजना राबविली जात आहे. या योजनेत रुग्णांना दानशूर व्यक्तींकडून सलग सहा महिने दरमहा पोषक आहार दिला जातो. त्यासाठी दानशुर व्यक्तींना केंद्र शासनाच्या एका संकेत स्थळावर नोंदणी करावी लागते आणि त्यांनी केलेल्या मदतीतून सामाजिक संस्थेमार्फत रुग्णांना पोषण आहार पोहचविण्याचे काम केंद्र शासन करित आहे. या योजनेत या योजनाकरिता ठाणे शहरात आढळून आलेल्या ९ हजार रुग्णांपैकी ४१३८ रुग्णांनी निक्षय मित्रांची गरज असल्याचे पालिका प्रशासनाला कळविले आहे. त्यातील ३०० रुग्णांची आमदार निरंजन डावखरे यांनी तर, इतर दानशूरांनी १८० रुग्णांची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत ४८० रुग्णांना निक्षय मित्र मिळाले असून उर्वरित ३६५८ रुग्ण निक्षय मित्रांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.