डोंबिवली : डोंबिवली येथील एका नोकरदाराला वाढीव व्याजाचे आमीष दाखवून युनिक कन्सलटन्सीचे मालक, भागीदार यांनी गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत चार कोटीची फसवणूक केली आहे. वाढीव व्याजाचा परतावा नाहीच, मूळ रक्कम परत मिळत नसल्याने नोकरदाराने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिक महेंद्र भानुशाली (४५, रा. टिळकनगर, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. युनिक कन्सलटन्सीचे मालक आणि भागीदार विनय पुरुषोत्तम वर्टी (६८), गीता विनय वर्टी (६०, रा. निळकंठ सोसायटी, पालिका डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर, फत्तेअलीह रोड, डोंबिवली पूर्व), डाॅ. सी. के. नारायण (६०, रा. गोवंडी), श्रीधर (५०, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. डिसेंबर २०२१ ते आजपर्यंतच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत सेवानिवृत्तांसाठी दर महिन्याला पेन्शन अदालत

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार प्रतिक भानुशाली यांना आरोपी विनय आणि गीता वर्टी आणि इतर दोन भागीदार यांनी युनिक कन्सलटन्सीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या गुंतवणूक योजनेत डिसेंबर २०२१ मध्ये ६० लाख ५० हजार गुंतविण्यास सांगितले. या गुंतवणुकीवर १० टक्के परतावा आणि वर्षभरात हे पैसे दुप्पट करुन देतो असे आश्वासन दिले. पैशांबरोबर सोनेही देण्याची हमी आरोपींनी दिली. वाढीव व्याज, सोने या आमिषाने एकूण चार कोटी रुपये आरोपींनी नोकरदार प्रतिक यांना गुंतविण्यास भाग पाडले. तुम्ही गुंतविलेले पैसे शेअर बाजारात गुंतविल्याने अधिकचा परतावा कमी कालावधीत मिळेल.

हेही वाचा >>> ठाणे: भिवंडीत अपघातात तीन ठार; चारजण बचावले, रिक्षा नाल्यात पडून दुर्घटना

तुमची गुंतवणूक दामदुप्पट होईल, असे आमिष आरोपी वर्टी पती, पत्नीने प्रतिक यांना दाखविले. तसेच चार कोटीचे वर्षभरात आठ कोटी रुपये करुन देण्याची हमी दिली. झटपट आकर्षक परतावा आणि संपत्ती वाढणार असल्याने प्रतिक यांनी या दाम्पत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आरोपींनी दिलेला कालावधी उलटूनही आकर्षक व्याज मिळाले नाही. वेळकाढूपणाची उत्तरे आरोपी देऊ लागले. दोन वर्ष उलटली तरी आकर्षक परतावा नाहीच पण मूळ रक्कमही आरोपींकडून परत मिळत नसल्याने ते आपली फसवूक करत आहेत, याची खात्री झाल्याने प्रतीक भानुशाली यांनी युनिक कन्सलटन्सीचे मालक विनय आणि गीता वर्टी व त्यांच्या दोन भागीदारांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. रामनगर पलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 crore fraud of an employee dombivali showing the lure ysh