कल्याण- शहापूर जवळील मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगाव मध्ये मंगळवारी दुपारी विद्यार्थ्यांची शाळेत वाहतूक करणाऱ्या एका इको मोटारीने एका चार वर्षाच्या शाळकरी मुलाला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या बालकाला कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे त्याच दिवशी उपचारा दरम्यान संध्याकाळी बालकाचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धडक देणाऱ्या इको व्हॅनमधून चार वर्षाचे बालक दररोज शाळेत येजा करत होते. त्याच मोटारीने दिलेल्या धडकेत बाळाचा मृत्यू झाल्याने आटगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंश अनिकेत बेलकर (४) असे मयत मुलाचे नाव आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत पदपथ अडविणाऱ्या दुकान, गॅरेज चालकांवर कारवाई, ग प्रभागाची आक्रमक कारवाई

अनिकेत हे आटगाव येथील रहिवासी आहेत. ते भिवंडी जवळील कोशिंबी गाव हद्दीत एका खासगी कंपनीत नोकरी करतात. अनिकेत यांचा चार वर्षाचा अंश मुलगा दररोज शहापूर जवळील गोठेघर मधील एका इंग्रजी शाळेत बालवर्गात जातो. त्याला आटगाव मधील घरापासून ते शाळेपर्यंत सोडण्यासाठी एक इको मोटार (एमएच-०२-ईपी-२३८२) येत होती. विद्यार्थ्यांची वाहतूक या मोटारीने केली जात आहे. सकाळी नऊ वाजता अंश शाळेत जायचा दुपारी दोन वाजता घरी परत येत होता.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मंगळवारी दुपारी अनिकेत कामावर असताना त्यांना त्यांचा मित्र शेखर शिंदे यांनी संपर्क करुन सांगितले की मुलगा अंशला त्याला शाळेत नेआण करणाऱ्या ईको मोटारीने जोराची धडक दिली आहे. तो गंभीर जखमी झाला आहे. अनिकेतच्या कुटुंबीयांनी धावपळ करुन अंशला तातडीच्या उपचारासाठी कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात आणले. अंशच्या डोक्याला, खांदा, पायाला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला अंश उपचाराला प्रतिसाद देत होता. संध्याकाळी त्याची प्रकृती खालवली. डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ईको मोटार चालकाने निष्काळजी, बेदरकारपणे मोटार चालवून मुलाला जोराची धडक दिली. त्यात अंशचा मृत्यू झाल्याने मुलाचे पालक अनिकेत बेलकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शहापूर पोलिसांकडे तो अधिकच्या तपासासाठी वर्ग केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 year old boy dies after being run over by school van near shahapur zws