कल्याण: शहराच्या विविध भागातून रिक्षा, बस स्थानक, सरकारी कार्यालय परिसरातून हरवलेले, गहाळ झालेले साडे पाच लाख रुपये किमतीचे ४४ मोबाईल शोधण्यात महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले. मोबाईल मालकांचा शोध घेऊन पोलिसांनी ४४ मोबाईल बुधवारी त्यांना परत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याण परिसरात विविध ठिकाणाहून गहाळ, हरवलेल्या मोबाईल विषयी मोबाईल मालकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केल्या होत्या. मागील चार महिन्यापासून अशापक्रारे तक्रारी दाखल होत होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने तपास करताना पोलिसांनी ४४ मोबाईल शोधून काढण्यात यश आले आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे हे मोबाईल शोधण्यात आले आहेत, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत घरफोड्या वाढल्या

साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल शोधासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, दीपक सरोदे आणि पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने गेल्या चार महिन्याच्या कालावधीत हे मोबाईल शोधून काढले. बुधवारी दुपारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे मोबाईल मालकांना परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल सापडल्याने मालकांनी समाधान व्यक्त केले.