ठाणे महापालिका क्षेत्रात प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही त्याचा वापर करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने वागळे इस्टेट, उथळसर, कळवा व दिवा भागात कारवाई करून ४५१ किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा- राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत होणार प्रवेश?

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Five shops were broken, Pune, shops looted,
पुणे : पाच दुकाने फोडून दीड लाख लंपास
Shocking findings from Yale School of Environment study on bio plastics Mumbai news
जैव – प्लास्टिकही पर्यावरणाला हानीकारक; जाणून घ्या, येल स्कूल ऑफ एनवायरमेंटच्या अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष
diwali crackers, air pollution, sound pollution
विश्लेषण : पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय? ते ठरवण्यासाठी कोणत्या चाचण्या घेतल्या जातात?
FDA raided establishments for adulteration seizing food stock worth Rs 311 crore
दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ३ कोटी ११ लाखांचा माल जप्त

पर्यावरणास हानीकारक असलेल्या प्लास्टिक वापरावर राज्य शासनाने बंदी घातली असून या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश राज्य शासनाने पालिकांना दिलेले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेकडूनही प्लास्टिक बंदी अभियान राबविण्यात येत आहे. ठाणे शहरात प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही त्याचा वापर काही व्यापारी छुप्या पद्धतीने करतात. अशा व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून प्लास्टिक साठा जप्त करण्याबरोबरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची कारवाई पालिकेकडून अभियानांतर्गत करण्यात येते. या अभियानांतर्गत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने वागळे इस्टेट, उथळसर, कळवा व दिवा भागात कारवाई करून ४५१ किलो प्लास्टिक साठा जप्त करत ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल केला आहे.

हेही वाचा- डोंबिवलीत आजदे गावात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

वागळे इस्टेट भागातील एकूण २३ आस्थापनांची पथकाने तपासणी करण्यात आली असून याठिकाणाहून एकूण ३ किलो प्लास्टिकचा साठा जप्त करून पाच हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील खोपट येथील गोकुळदासवाडी भागातील एका गोदामामधून ४५० किलो प्लास्टिकचा साठा जप्त करून पाच हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. कळवा भागातील ८ आस्थापनांमधून पथकाने १ किलो प्लास्टिकचा साठा जप्त करून दिड हजार रुपये दंड वसुल केला आहे. ही कारवाई उपायुक्त तुषार पवार यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक जयंत पटनाईक, रायमन दांडेकर, उपमुख्य स्वच्छता यांच्या पथकाने केली आहे.