राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरात रस्ते कॉंक्रिटीकरण, नाले या पायाभूत सुविधांसाह समाज मंदिर, अभ्यासिका उभारणीची कामे केली जाणार आहेत. निवडणुकांच्या तोंडावर उपलब्ध झालेल्या या निधीमुळे माजी नगरसेवकांत समाधानाचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अमरावती : हरभरा खरेदी नोंदणीसाठी शेतकरी रात्रभर रांगेत; खरेदी केंद्रांवर झुंबड

उल्हासनगर महापालिकेच्या सदस्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षाच संपुष्टात आला. त्यामुळे शहरात सर्व नगरसेवक माजी झाले आहेत. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर बहुतांश शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देिला. त्यामुळे उल्हासनगरात सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांचे वर्चस्व दिसून येते आहे. त्यातच महापालिकेत प्रशासकीय राजवट असली तरी राज्य सराकराकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधी कमी पडू दिला जात नाही. याची प्रचिती नुकतीच आली असून राज्याच्या नगरविकास विभागाने उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना आणि भाजपातील विविध माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये या निधीतून कामे केली जाणार आहेत. शिवसेनेच्या विविध माजी नगरसेवकांनी या कामांसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. अखेर नगरविकास विभागाने या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून उल्हासनगर शहरातील अनेक कामे प्रगतीपथावर येणार असून नागरिकांना काँक्रीटचे रस्ते, बगीचे, महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. महापालिका निवडणुका येत्या काळात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांपूर्वी उपलब्ध झालेल्या या निधीमुळे माजी नगरसेवकांना फायदा होणार असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा- वर्धा : पंतप्रधानांच्या गतीशक्ती योजनेमुळे रुपडे पालटणार; ‘ही’ रेल्वे स्थानके होणार चकाचक

ही कामे होणार

उल्हासनगरात सार्वजनिक शौचालय, महिलासांठी स्वतंत्र शौचालय, नाल्यांची उभारणी, संरक्षण भिंत उभारणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, नवीन रस्ते, पदपथ तयार करणे, समाजमंदिर , अभ्यासिका, उद्यान, आरोग्य केंद्र, धावपट्टी, बाकडे बसविणे, विद्युत दिवे, पत्र्यांचे शेड, मोरी दुरुस्ती, पायवाट, जलवाहिनी टाकणे, सभामंडप उभारणे, इतर सुविधा आणि साधनसामग्री युक्त व्यायामशाळा उभारणे अशी कामे या निधीतून केले जाणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 47 crores sanctioned for development works in ulhasnagar dpj