कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील न्यायालयांमध्ये शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विविध प्रकारची, अनेक वर्षे रखडलेली ४८ हजार ९८८ प्रकरणे निकाली काढून १२८ कोटी लाभार्थींना देण्यात आले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तडजोडीने मिटविण्याच्या प्रकरणात जास्तीत जास्त ४७ कोटीपर्यंत प्रकरणे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याने मार्गी लावण्यात आली. मोटार अपघात न्याय प्राधिकरणाची ३५ कोटींची प्रकरणे निकाली लावण्यात येऊन एकूण प्रकरणांच्या १२.८७ टक्के प्रकरणे मार्गी लावण्यात आली. लोक अदालतमध्ये एकूण दोन लाख २९ हजार ५८९ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. या प्रकरणांमधील ४८ हजार ९८८ प्रकरणे मार्गी लावण्यात आली. कामगारांशी निगडीत कामगार न्यायालयाने तीन कोटी २७ लाखांची प्रकरणे मार्गी लावली, असे सचिव सूर्यवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याण लोकसभेत भाजपाचे मंत्री वारंवार का येतायत? शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले…

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात छतावरील पत्रे काढल्याने प्रवासी उन्हात

ठाणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये ८८ गट करून ही प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात आली होती. कल्याण न्याय गटाकडून कल्याणमधील रहिवासी विलास म्हात्रे (४३) यांना बजाज अलायन्झ विमा कंपनीकडून मोटार अपघात प्रकरणात ७३ लाख मिळून देण्यात न्याय प्राधिकरणाला यश आले. विलास म्हात्रे हे दुचाकीवरून जात असताना एका वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाले होते. हे प्रकरण २०१४ पासून मोटार अपघात न्याय प्राधिकरणासमोर सुरू होते, असे म्हात्रे यांचे वकील व्ही. के. सिंग यांनी सांगितले. म्हात्रे हे व्यावसायिक होते. त्यांना वार्षिक सहा लाख रुपये उत्पन्न मिळत होते. या उत्पन्नावर त्यांचे घर, कामगार यांचा चरितार्थ चालत होता. म्हात्रे यांच्यातर्फे त्यांच्या कुटुंबियांना ७५ लाख नुकसान भरपाईचा दावा प्राधिकरणासमोर केला होता. लोक अदालतमध्ये हे प्रकरण आल्यावर याप्रकरणात ७३ लाख रुपये तडजोडीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा कंपनीतर्फे ॲड. अरविंद तिवारी यांनी हे प्रकरण लोक अदालतसमोर आणले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 49 thousand cases worth 128 crores were settled in the national lok adalat in thane ssb