पाचपाखाडी येथील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणाची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पाचपाखाडी येथील टेकडी बंगला परिसरात इमारत आहे. या इमारतीत पाच वर्षीय मुलगा त्याच्या कुटुंबासह राहत होता. मंगळवारी दुपारी तो घरामध्ये खेळत असताना तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाची नोंद रात्री उशीरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Story img Loader