सेंट्रल मैदानाजवळ रविवारी सकाळी ठाणे महापालिकेच्या टीएमटीच्या बसगाडीला आग लागल्याची घटना उघडकीस आली. या बसगाडीत सुमारे ५० प्रवासी होते. स्थानिक रहिवाशी आणि महापालिकेच्या कर्मचारी यांच्या मदतीने या प्रवाशांना बसगाडीच्या मागील दरवाजातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा >>> ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी संकट; ठाण्यात विभागवार पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा बंद राहणार
भिवंडी येथील नारपोली भागातून रविवारी सकाळी सुटलेली बसगाडी ठाण्यातील चेंदनी कोळीवाड्याच्या दिशेने जात होती. बसगाडी साडे आठ वाजताच्या सुमारास सेंट्रल मैदान येथे आली असता बसगाडीच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. चालक आणि वाहकानी तात्काळ याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. त्यांनतर आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवाशी आणि महापालिकेच्या कर्मचारी यांच्या मदतीने या प्रवाशांना बसगाडीच्या मागील दरवाजातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.