लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीचे आणि अंतर्गत अशा एकूण २७ काँक्रीट रस्ते कामांसाठी ५११ कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या रस्ते कामांच्या निवीदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया लवकरच शासन पूर्ण करील. येत्या दोन वर्षात ही रस्ते कामे गतिमानतेने कल्याण डोंबिवली पालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्ण करायची आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी डोंबिवली जीमखाना येथे माध्यमांना दिली.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली
Estimated tax evasion of 25 thousand crores 18 thousand fake companies busted by GST authorities print eco news
तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा

या रस्ते कामांव्यतिरिक्त चोळे गाव गणपती विसर्जन तलाव, कोपर तलाव, खंबाळपाडा भोईरवाडी गणपती विसर्जन तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामांसाठी एकूण १५ कोटीचा निधी प्रस्तावित आहे. जुनी डोंबिवली आणि गणेशनगर येथील गणपती विसर्जन घाट, गणेशनगर येथील खाडी किनारा विकास कामांसाठी २३ कोटी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील अंतर्गत रस्ते कामांसाठी १० कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती सुधार योजनेंतर्गत पाच कोटी निधी प्रस्तावित आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

आणखी वाचा-राहुल गांधी यांच्या यात्रेचा भिवंडी काँग्रेसला ‘हात’भार

डोंबिवली पूर्व, पश्चिम मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसाठी ३७५ कोटी, डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक सुशोभिकरण योजनेसाठी आठ कोटी, शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत कामांसाठी ७५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्ते कामांमुळे रस्ते सुस्थितीत होऊन खड्डेमुक्त प्रवास प्रवाशांना करता येईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

हा निधी मंजूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. डोंबिवलीतील ४४२ कोटीच्या ३६ रस्ते कामांना ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता शासनाने दिली होती. यामधील ४२ कोटीची नऊ रस्ते कल्याण डोंबिवली पालिका, उर्वरित २७ रस्त्यौंची कामे एमएमआरडीएकडून केली जाणार आहेत. या कामांसाठी ४०१ कोटीचा निधी प्रस्तावित आहे. या कामांसाठी मे. लॅन्डमार्क कार्पोरेशन, मे. निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुप, मे. आर. ई. इन्फ्राप्रोजेक्ट, मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन यां ठेकेदारांनी निवीदा भरल्या आहेत.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात आणखी एक जिना दुरुस्तीच्या कामासाठी बंद, प्रवाशांचा मनस्ताप सुरुच…

प्रस्तावित काँक्रिट रस्ते

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील विठ्ठल प्लाझा ते कल्याण रस्ता, ९० फुटी रस्ता ते चामुंडा उद्यान, खंबाळपाडा लक्ष्मीपार्क ते विघ्नहर्ता इमारत, चोळेगाव मंदिर, छेडा रस्ता, ९० फुटी छेद रस्ता, व्ही. पी. रस्ता, टिळक रस्ता, गणेश मंदिर, भगतसिंग रस्ता, मुखर्जी रस्ता, आगरकर रस्ता, जी. बी. सामंत मार्ग, आयरे लक्ष्मण रेषा रस्ता, ठाकुरवाडी, देवीपाचापाडा-गोपीनाथ चौक वळण रस्ता, सुभाष रस्ता, श्रीधऱ् म्हात्रे-वळण रस्ता.

डोंबिवलीतील नागरिकांना सुस्थितीमधील काँक्रीट रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशाने शासनाने ५११ कोटीचा निधी मंजूर केला आहे. ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे. -रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.