ठाणे : भिवंडी शहरातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीवर चारजणांनी दोनदा सामुहीक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेदरम्यान, चौघांनी या तरुणींच्या भावाला आणि रिक्षाचालकाला मारहाण केली असून याप्रकरणी चार तरुण आणि त्यांना गुन्ह्यात मदत करणारे दोघे अशा सहा जणांविरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी येथील एका गावात पिडीत २२ वर्षीय तरुणी राहते. याच गावात चौघे आरोपी राहतात. पिडीत तरुणी २० फेब्रुवारी रोजी आत्याच्या घरी गेली होती. तिथे ती झोपलेली असताना तिला अचानक जाग आली. तिने मोबाईल बघितला असता, तिला तिच्या भावाचे १५ मिसकाॅल दिसले. तिने भावाला लगेचच फोन केला असता, त्याने तब्येत बरी नसल्याचे सांगत तिला एका ठिकाणी येण्यास सांगितले. त्यानुसार ती ओळ‌खीच्या एका रिक्षामधून त्याठिकाणी गेली. त्यावेळी तिथे असलेल्या चौघांनी तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला मारहाण केली. त्यानंतर पिडीतेला रिक्षामध्ये बसवून एका झाडाझुडपात नेले.

तिथे चौघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी तिला दुसऱ्या ठिकाणी नेले आणि तिथे एका टेम्पोमध्ये तिच्यावर पुन्हा सामुहिक अत्याचार केला. २० फेब्रुवारी रोजी रात्री १.३० ते पहाटे ६ या कालावधीत ही घटना घडली. या पिडीतेने भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदविली होती. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण शांतीनगर पोलिसांकडे वर्ग केले आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेश चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा देत चौघांना मदत करणाऱ्या एकास अटक केल्याचे सांगितले. तसेच चौघांसह इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.नीलेश पानमंद