कल्याण – कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा भागातील ६० फुटी रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांचे हाल होत आहेत. या रस्त्यावर दोन शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षकांना दररोज या खड्ड्यांना सामोरे जात शाळेची वाट धरावी लागते.

सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता आहे. हे माहिती असुनही पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी, या रस्त्याचा ठेकेदार खड्डे भरण्यासाठी किंवा रस्ता सुस्थितीत करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने परिसरातील नागरिकांसह शिक्षक, पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चिंचपाडा परिसरात नवीन गृहसंकुले झाली आहेत. या भागातील वस्ती वाढली आहे. कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाकडून प्रवासी याच रस्त्याने रिक्षा, खासगी वाहनाने प्रवास करतात. गणपती सणापूर्वी या रस्त्यावरील खड्डे खडी टाकून भरण्यात आले होते. ही वरवरची मलमपट्टी असल्याने सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे या खड्ड्यांमधील खडी निघून तेथे मोठाले खड्डे पडले आहेत.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

हेही वाचा >>> पुण्यातील नर्सरीमध्ये काम करणाऱ्या मजुराची हत्या करणारे कल्याणमध्ये अटक

चिंचपाडा परिसरातील पालक सकाळ, संध्याकाळ या खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून आपल्या मुलांना शाळेत घेऊन येतात. शाळेत जाताना खड्यांच्या भागातून जाताना अनेक वेळा वाहन खड्ड्यात आपटले की ते माती मिश्रित पाणी विद्यार्थी, पालकांच्या अंगावर उडते. बाजारात खरेदीसाठी आलेल्या पादचाऱ्यांना हाच अनुभव येतो. ज्येष्ठ नागरिक, वृध्दांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते. अनेक रिक्षा चालक ६० फुटी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या भागातील प्रवासी भाडे घेण्यास नकार देतात. त्यामुळे कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाकडून चिंचपाडाकडे येणाऱ्या प्रवाशांची दररोज कुचंबणा होत आहे.

हेही वाचा >>> दरवाजे बंद न झाल्याने वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात खोळंबली

येत्या दोन दिवसात ६० फुटी रस्त्यावरील खड्डे पालिकेने बुजविले नाहीतर या भागातील रहिवासी पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्यावर खड्डे पडले असतील तर ठेकेदाराला त्या रस्त्यावर तात्काळ खडी टाकण्यास सांगून तो रस्ता सुस्थितीत करण्यास सांगतो. जगदीश कोरे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.