ठाणे: यंदा तुळशी विवाहानंतर लग्नाचे सर्वाधिक म्हणजेच ६३ मुहूर्त असून ते पुढील वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंतचे आहेत. त्यातही नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक मुहूर्त आहेत. गेल्यावर्षी ५५ मुहूर्त होते. यंदा आठ मुहूर्त जास्त आहेत. यामुळे लग्न ठरलेल्या वर आणि वधूच्या कुटूंबियांनी सभागृहांची विवाहासाठी आगाऊ नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. यंदा तुळशी विवाहानंतर जास्त मुहूर्त असल्याने सनई-चौघडे मोठ्याप्रमाणात वाजणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिवाळी संपल्यावर तुळशीच्या लग्नाचे वेध लागतात. तुळशी विवाह पार पडल्यानंतर विवाह इच्छुकांना विवाह करण्यासाठी उत्तम कालावधी असतो. याकालावधीत विवाह मुहूर्त पाहून लग्नाची तारिख ठरवली जाते. मागील वर्षी तुळशी विवाहानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ पर्यंत ५५ लग्नाचे मुहूर्त होते. तर, यंदाच्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर हा कालावधी चातुर्मासाचा असल्यामुळे या महिन्यात मुहूर्त नव्हते. त्यात, यंदा श्रावण अधिकमास होता. त्यामुळे चातुर्मास पाच महिन्यांचा झाला होता. म्हणून यंदा तुळशी विवाहारंभ १९ दिवस उशिरा आला असल्याची माहिती दा.कृ.सोमण यांनी दिली. यंदा विवाहाचा कालावधी लांबला असला तरी तुळशी विवाहानंतर सर्वाधिक लग्नाचे मुहूर्त आहेत.
यंदाच्या वर्षी तुळशी विवाहानंतर अवघ्या तीन दिवसातच लग्नाचा पहिला मुहूर्त आल्याचे पाहायला मिळत आहे. २८ नोव्हेंबरपासून विवाहाचे मुहूर्त सुरु झाले आहेत. नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विवाह मुहूर्तांची संख्या जास्त आहे. त्यातही, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ मुहूर्त आहेत. तसेच गुरू ग्रहाचा अस्त ६ मे २०२४ ते २५ जून २०२४ आहे. तर, शुक्र ग्रहाचा अस्त ८ मे ते १ जून २०२४ आहे. त्यामुळे मे आणि जून महिन्यात विवाह मुहूर्त प्रत्येकी दोनच आहेत. विवाह तारखेच्या चार ते पाच महिन्या आधिपासून विवाह कार्यालयात नोंद केली जाते. यंदाही नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंतच्या विवाहाची नोंद विवाह कार्यालयात करण्यात येत आहे.
विवाह इच्छुकांना यंदा तुळशी विवाहानंतर विवाह करण्यासाठी भरपूर विवाहमुहूर्त आहेत. त्यामुळे खानपान व्यवसाय, मंडप, वाजंत्री आणि पुरोहित यांना भरपूर काम मिळणार आहे. – दा.कृ.सोमण, पंचांगकर्ते.
करोना काळात या क्षेत्राला प्रचंड फटका बसला होता. २०२२ नंतर काही प्रमाणात आर्थिक घडी रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. परंतू, यंदाच्या वर्षी आलेल्या सर्वाधिक विवाह मुहूर्तांमुळे या क्षेत्राला पुन्हा झळाली मिळणार आहे. विवाह कार्यालयांमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदणी झाल्या आहेत. – कार्तिक शहा, संचालक
यंदाचे विवाह मुहूर्त (नोव्हेंबर २०२३ ते जूलै २०२४ पर्यंत)
महिना | दिनांक |
नोव्हेंबर | २८, २९ |
डिसेंबर | ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, ३१ |
जानेवारी | २, ३, ४, ५, ६, ८,१७,२२, २७, २८, ३०, ३१ |
फेब्रुवारी | १, २, ४, ६, १२, १३, १७, १८, २४, २६, २८, २९ |
मार्च | ३, ४, ६, १६, १७, २६,२७,३० |
एप्रिल | १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६,२८ |
मे | १ , २ |
जून | २९, ३० |
जुलै | ९, ११, १२, १३, १४, १५ |