महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारुन भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रभाव असणाऱ्या ठाण्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारत भाजपाच्या सोबतीने सरकार स्थापन केलेल्या आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांची काल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील नगरसेवकांनी भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. ठाण्यातील एकूण ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली आहे. मात्र या बातमीनंतर शिंदेंच्या विरोध असणारा तो एकमेव नगरसेवक कोण यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.
नक्की पाहा >> Photos: “घराची पायरी चढताच माझी…” CM होऊन घरी परतल्यानंतर शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, “त्याने मला पाहिल्यावर…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा