ठाणे : जिल्ह्यात गेल्याकाही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना शनिवारी जिल्ह्यात ६८ करोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ठाणे शहरातील ५१ रुग्णांचा सामावेश आहे. जिल्ह्यात आठवड्याभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तीनजण हे ठाणे शहरातील असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरात झपाट्याने करोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा – राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कल्याणमध्ये काँग्रेसचा मोर्चा
जिल्ह्यातील एकूण सक्रिय २९४ पैकी २४८ सक्रिय रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ठाणे पाठोपाठ नवीमुंबई ६, ठाणे ग्रामीण आणि भिवंडी प्रत्येकी ३, कल्याण – डोंबिवली व मीरा-भाईंदर प्रत्येकी २ आणि उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १ करोना रुग्ण आढळून आल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिले. जिल्ह्यात मागील आठवड्याभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, ठाणे शहरातील तिघांचा यामध्ये सामावेश आहे. तर शनिवारी शहरात एच ३ एन २ आजाराचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.