उल्हासनगरः रेल्वे खात्यात नोकरी लावून देतो असे सांगून उल्हासनगरात एका तरुणाची दोन भामट्यांनी तब्बल ६९ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या भामट्यांनी संबंधित तरिणाला बनावट नियुक्ती पत्र आणि सेवेत रूजू होण्याचे पत्रही तयार करून दिले होते. मात्र हे पत्र बनवाट असल्याचे समोर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पर्धा परिक्षा, शासकीय संस्थांच्या परिक्षा या ऑनलाइन पद्धतीने होऊन त्याची माहिती सार्वजनिक संकेतस्थळांवर जाहीर केली जाते. मात्र तरीही यात फसवणुकीचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. असाच एक फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प एक परिसरात अक्षय लोहार हा तरुण राहतो. नोकरीच्या शोधात राहणाऱ्या या अक्षयची ओळख कल्याण येथे राहणाऱ्या श्रद्धा उर्फ जान्हवी दत्ताराम चौगुले (२४) आणि उल्हासनगरच्या दिपक रमेश महाजन (२६) या दोघांशी झाली. या दोघांनीही अक्षय याला रेल्वे खात्यात नोकरी लावून देऊ. आमची खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे असे सांगितले. त्यानुसार सप्टेंबर २०२१ पासून या दोघांनी अक्षयकडून नोकरीचे अमिष दाखवून पैसे उकळण्यास सुरुवात केली. यातील श्रद्धा उर्फ जान्हवी चौगुले हिने अक्षयला रेल्वे खात्याचे बनावट नियुक्ती पत्र आणि सेवेत रूजू होण्याचे प्रत्र सही आणि शिक्क्यासह बनवून दिले होते. त्यामुळे हे पत्र खरे असल्याचे समजून अक्षय रेल्वे खात्यात रूजू होण्यासाठी गेला. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने हे नियुक्ती पत्र बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे अक्षयच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ उल्हासनगर पोलिसात धाव घेतली.

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Class 12th boy goes missing from Dombivli Lodha Haven
डोंबिवली लोढा हेवन येथून बारावीचा मुलगा बेपत्ता
Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
Increase in entertainment fees business license fees Mumbai print news
करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ; व्यावसायिक झोपड्यांना कर
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

हेही वाचा – भाजपा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीमुळे डॉ. श्रीकांत शिंदे दोनदा खासदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात श्रद्धा चौगुले आणि दिपक महाजन यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा नोकरीच्या अमिषाने लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांनी अशा व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Story img Loader