ठाणे : दिवा येथील संतोष नगर भागात ठाणे महापालिकेच्या घंटागाडीने ७४ वर्षीय व्यक्तीला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिताराम थोटम असे मृताचे नाव असून या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात केली जात आहे. ही घंटागाडी चालक पाठिमागे (रिव्हर्स) चालवित नेत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात स्पष्ट झाले आहे.
ठाणे : दिवा येथील संतोष नगर भागात ठाणे महापालिकेच्या घंटागाडीने ७४ वर्षीय व्यक्तीला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. https://t.co/2jrmCKw8Ui #Maharashtra #Thane #Diva pic.twitter.com/AwSlb68WoH
— LoksattaLive (@LoksattaLive) January 24, 2025
संतोष नगर येथील चाळ क्रमांक दोन परिसरात सिताराम थोटम हे वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या परिसरातील कचरा वाहून नेण्यासाठी ठाणे महापालिकेची घंटागाडी आली होती. ही घंटागाडी संबंधित चालक पाठिमागे नेत होता. त्याचवेळी थोटम हे त्या गाडीच्या मागे होते. त्यांना घंटागाडी मागे येत असल्याचे दिसले नाही. त्यामुळे ते घंटागाडी खाली आले. या अपघातात ते गाडीसोबत काही मीटर अंतरापर्यंत फरफटत गेल्याने त्यांना गंभीर जखम झाली. त्यांना उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात केली जात आहे.
© The Indian Express (P) Ltd