लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात गेल्यावर्षभरामध्ये दाखल झालेल्या ११ हजार ९६७ गुन्ह्यांपैकी ८ हजार ९३० गुन्हे ठाणे पोलिसांनी उघडकीस आले असून त्याचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे. खून, खूनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी असे गंभीर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे तर, दरोडा, विश्वासघात, खंडणी, ठकबाजी, अपघात, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी असे गुन्हे उघडकीसचे प्रमाण ६० ते ९० टक्के इतके आहे. घरफोडी, चोरी, वाहन चोरीचे गुन्ह्यांच्या उघडकीसचे प्रमाण कमी असून हे प्रमाण ३७ ते ४१ टक्के इतके आहे. तसेच गेल्या वर्षभरात पोलिसांनी परकीय नागरिक कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल केले असून यामध्ये ५९ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. या शहरांमध्ये ठाणे पोलिसांची पाच परिमंडळे, गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर गुन्हे अन्वेषण शाखा कार्यरत आहेत. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील गुन्हेगारीला पायबंद घालण्याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यावर गेल्या वर्षभरात भर दिला. तसेच शाळेतील मुलामुलींच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी पथक उपक्रम राबविला. या सर्वाचे सकारात्मक परिणाम आता वार्षिक आढाव्यादरम्यान दिसून आले आहेत. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ठाणे पोलिसांच्या वार्षिक कामगिरीचा लेखाजोखा मांडला. संपुर्ण आयुक्तालय क्षेत्रात गेल्यावर्षभरामध्ये ११ हजार ९६७ इतके गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ८ हजार ९३० गुन्हे ठाणे पोलिसांनी उघडकीस आले असून त्याचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे, अशी माहिती आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी यावेळी दिली.
आणखी वाचा-ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ८२ लाखांची फसवणूक, गुंतवणूक नियोजकाची आत्महत्या
गेल्या वर्षभरात खूनाचे ८५ गुन्हे दाखल झाले असून हे सर्व गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी १७० आरोपींना अटक केले आहे. खूनाचा प्रयत्नाचे १६८ गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी ४२३ आरोपींना अटक केले आहे. दरोडाप्रकरणी दाखल असलेल्या १० पैकी ९ गुन्हे उघडकीस आले असून यात ३६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. दरोड्याची तयारी, मटका- जुगार, अमली पदाथी सेवन, पीटा ॲक्ट, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी असे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण १०० टक्के इतके आहे. जबरी चोरीचे ६७ टक्के, सोनसाखळी चोरीचे ७९ टक्के, अवैध दारू विक्री आणि वाहतूकचे ९९ टक्के, ठकबाजी ६३ टक्के, विश्वासघाताचे ९० टक्के, खंडणीचे ९१ टक्के, मारामारीचे ९८ टक्के, दुखापतचे ९७ टक्के, बनावट चलनचे ६७ टक्के, मोटार अपघाताचे ७१ टक्के, मरणास कारणीभूतचे ८४ टक्के, आत्महत्येस प्रवृत्त करणे ९१ टक्के असे गुन्हे उघडकीसचे प्रमाण आहे. बलात्काराचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ९९ टक्के तर, विनयभंगचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ९६ टक्के इतके आहे, अशी माहिती डुंबरे यांनी दिली.
ठाणे पोलिस आयुक्तालयात गेल्या वर्षभरात दाखल झालेले घरफोडीचे ७८० पैकी ३१५ गुन्हे उघडकीस आले. यात २३५ आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हे उघडकीसचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. चोरीप्रकरणी दाखल असलेल्या ११८५ पैकी ४९० गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचे प्रमाण ४१ टक्के इतके आहे. मोटार चोरीचे १३५१ गुन्हे दाखल असून त्यापैकी ४९० गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचे प्रमाण ३७ टक्के इतकेच आहे.
आणखी वाचा-कल्याणमधील तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तमीळनाडूतील तरूणाकडून लैंगिक अत्याचार
पोलिस ठाण्यांमध्ये स्वागत कक्ष, आपले ठाणे सुरक्षित ठाणे उपक्रम, सीआरएम व्हॅन, पायी गस्त, ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष, पोलिस मित्र, महिला पोलिस विश्रामिका, सोशल मिडीया मॉनिटरिंग सेल या उपक्रमांबरोबरच १९९७ ठिकाणी ६०५१ सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच शहरातील गुन्ह्यांचे स्वरुप बदलत आहे. अशा गुन्ह्यांना पायबंद घालणे आणि गुन्हे घडल्यास ते उघडकीस आणणे यावर भर दिला जात आहे. त्यामुळे गुन्ह्यांची आकडेवारी आमच्यासाठी महत्वाची नाही. तसेच ठाणे पोलिस आयुक्तालयात नवीन पाच पोलिस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेले आहे. -आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे