खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; पत्राद्वारे मुलींचे आत्मकथन
‘रात्री झोपत असताना माझा दादा नको त्या ठिकाणी स्पर्श करतो’,‘पोलीस असलेले मामा लैंगिक चाळे करतात’,‘मावशीचा नवरा येता जाता चोरटा स्पर्श करतो’.. वाचणाऱ्या प्रत्येकालाच हादरवून सोडणारी ही विधाने आहेत वसईतील शाळांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींची. एकीकडे समाजात महिला सुरक्षित राहाव्यात, यासाठी पोलीस आणि सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असताना अनेक मुलींना कुटुंबांतूनच लैंगिक छळांना सामोरे जावे लागत आहे. वसईतील जाणीव या खासगी संस्थेने केलेल्या शाळानिहाय सर्वेक्षणात सहा हजारपैकी सुमारे ८०० मुलींनी आपल्यावर असा प्रसंग गुदरल्याची कबुली दिली आहे.
शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना समाजातील विविध धोके, चुकीचे स्पर्श, पुरुषी मनोवृत्तीची जाणीव करून देण्यासाठी आरती वढेर ही तरुणी ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवत असते. तिच्या ‘जाणीव’ या संस्थेने लैंगिक छळाबद्दलची मते जाणून घेण्यासाठी अलीकडेच वसईतील ३२ शाळांमधील सहा हजार मुलींचे सर्वेक्षण केले. या मुलींना स्वत:ची ओळख न सांगता मनात वाटत असलेले प्रश्न, भीती, शंका तसेच लैंगिक छळाचे अनुभव मांडण्यास सांगण्यात आले होते. या सर्वेक्षणातून हाती आलेली माहिती अतिशय धक्कादायक असल्याचे संस्थेने म्हटले आहे. सहा हजार मुलींपैकी जवळपास आठ टक्के मुलींनी आपल्यासोबत लैंगिक छळ झाल्याचे म्हटले आहे. अनेक मुलींनी त्यांचे वडील, भाऊ, काका, मावशीेचा नवरा, चुलत भाऊ लैंगिक छळ करत असल्याचे सांगितले. ते नको त्या ठिकाणीे स्पर्श करतात, रात्री झोपेच्या वेळी लैंगिक चाळे करतात अशीे कबुलीे दिलीे. अशा परिस्थितीेत काय करायचं, कसा प्रतिकार करायचा असा सवाल त्यांनी विचारला आहे.
‘नामांकित शाळेत शिकणाऱ्या आणि सुसंस्कृत घरातल्या मुलींना अशा प्रसंगांचा सामना (पान ३वर)
(पान १ वरून) करावा लागत आहे, ही गोष्ट खूपच धक्कादायक आहे. या गोष्टींमुळे अनेक मुलीे भेदरेलेल्या आहेत आणि त्यांचा मानसिक कोंडमारा होत आहे. प्रेमात पडल्यावर त्यांना मित्राकडून लैंगिक सुखाचीे मागणीे होत असते आणि त्यांना त्यासाठी ब्लॅकमेल करून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे या वयातल्या मुलीे अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत,’ असे आरतीने सांगितले. जाणीव मोहिमेचे आयोजक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले की, ‘मुलींमध्ये जनजागृती करताना त्यांचे मन जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले होते. पण त्यातून लैंगिक छळाला या मुलीे बळी पडत असल्याचीे बाब समोर आलीे. कुटुंबात जर लैंगिक छळ होत असेल तर त्यांनी आपल्या आईला सांगायला हवे. आईच त्यांना यातून बाहेर काढू शकते. म्हणून आता यापुढे आम्ही शाळांमध्ये या विषयावर खुला सुसंवाद घडवून आणणार आहोत.
अशा प्रकाराचा विकृत लैंगिक छळ रोखण्यासाठी शासनाने गुड टच बॅड टच यांचीे ओळख करून देणारा उपक्रम सुरू केला आहे. नकळत्या वयातीेल मुलींपर्यंत तो अधिकाअधिक पोहोचवायला हवा. स्त्रियांचा सन्मान करणारे संस्कार मुळापासून घराघरात रूजवले पाहिजेत. स्त्रियांकडे आदरयुक्त नजरेने बघण्याची भावना रूजलीे तर फरक पडेल. मुलींनी असा काही त्रास झाला तर १०३ क्रमांकांच्या महिला हेल्पलाईनचीे किंवा स्थानिक पोलीस ठाण्याचीे मदत घ्यावीे. महिला दक्षता समितीेत प्रतिष्ठित महिला तसेच समुदपदेशक असतात. तसेच महिला पोलीस मित्रांचीे मदत घेतलीे तर या त्रासापासून सुटका होऊ शकेल.
-डॉ.रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा