अंबरनाथ शहराच्या स्थानक परिसराची कोंडी फोडून येथील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी सॅटीस प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. पूर्व भागात असलेल्या वाहनतळाचाही समावेश या प्रकल्पात करण्याला काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. त्यासाठी निधीची आवश्यकता होती. नुकत्याच पार पडलेल्या एमएमआरडीएच्या १५३ व्या बैठकीत अंबरनाथच्या या सॅटीस प्रकल्पासाठी ८१ कोटी ५३ लाख रूपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यानंतर आता अंबरनाथ शहरातही सॅटीसची उभारणी शक्य होणार आहे.

हेही वाचा- संयुक्त घनकचरा प्रकल्पासाठी १४८ कोटी मंजूर; बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरचा संयुक्त घनकचरा प्रकल्प होणार

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती अशा स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारील य.मा. चव्हाण खुले नाट्यगृह कला आणि नाट्य चळवळीचे केंद्र होते. बहुउद्देशीय वापराचे वाहनतळ उभारण्यासाठी काही वर्षांपूर्वी नाट्यगृह जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले. मात्र उभारणीपासूनच हे वाहनतळ वादाच्या भोवऱ्यात सापडले. यातील भूमिगत मजला आणि तळमजल्यावर सध्या वाहनतळ सुरू आहे. मात्र अजूनही ही वास्तू अपूर्ण असून ती भकास वास्तूप्रमाणे दिसते. त्यातच स्थानकाशेजारील या चौक परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाला याठिकाणी सॅटीसची चाचपणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचा- ठाण्यात झाड पडून तीन जण जखमी; धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

गेल्या महिन्यात स्थानकाशेजारील वादग्रस्त वाहनतळाची वास्तू सॅटीस प्रकल्पात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. त्याआधी पालिकेने या वाहनतळाच्या वास्तूचे संरचनात्मक लेखापरिक्षण केले होते. ही वास्तू सॅटीसमध्ये समाविष्ट करण्यासाठी योग्य असल्याचा निर्वाळा मिळाला होता. या वास्तूचा सॅटीसमध्ये समावेश केल्याने या प्रकल्पाचा खर्च वाढणार होता. तसा सुधारित प्रस्तावही पालिका प्रशासनाने एमएमआरडीएला सादर केला होता. नुकतीच एमएमआरडीएची १५३ वी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी ८१ कोटी ५३ लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या सॅटीसच्या कामाला गती मिळणार आहे.

Story img Loader