हल्ली साहित्य संमेलनातील परिसंवादांपेक्षा त्यानिमित्ताने होणाऱ्या वादांचीच अधिक चर्चा होताना दिसते. डोंबिवलीत भरणारे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही त्याला अपवाद नाही. निश्चलनीकरण आणि निवडणुकांपर्यंतचे अनेक अडथळे पार करीत अखेर संमेलनाची मांडव उभारणी सुरू झाली आहे. मात्र स्वागतयात्रेच्या रूपाने गुढीपाडव्याला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देणाऱ्या डोंबिवलीतील साहित्य संमेलनाचे यजमानपद ‘आगरी युथ फोरम’ने भूषविणे निश्चितच वेगळा पायंडा पाडणारे ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे आणि ठाण्यापाठोपाठ मराठी माणसांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीत भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. ठाणे शहरात यापूर्वी तीनदा साहित्य संमेलने झाली. त्यामुळे गेली काही वर्षे कल्याण-डोंबिवलीत साहित्य संमेलन व्हावे, यासाठी स्थानिक साहित्यप्रेमी मंडळी आग्रही होती. मात्र हल्ली संमेलन भरविण्यासाठी केवळ साहित्याविषयी प्रेम आणि आस्था असून भागत नाही. तीन दिवसांच्या या उत्सवाचा कोटय़वधी रुपयांचा खर्च पेलू शकेल अथवा निधी जमा करू शकेल, अशा वजनदार व्यक्तीशिवाय हल्ली संमेलने पार पडूच शकत नाहीत. त्यामुळेच साहित्य संमेलनाचे भवितव्य अध्यक्ष कोण आहे, यापेक्षा हल्ली स्वागताध्यक्ष कोण आहे, यावरून ठरू लागले आहे. डोंबिवलीतले ९० वे संमेलनही त्याला अपवाद नाही. ‘आगरी युथ फोरम’ या शहरातील संस्थेने संमेलनाचे यजमानपद स्वीकारून हा साहित्यमेळा आगळावेगळा आणि भविष्यातील वाङ्मयीन उपक्रमांना मार्गदर्शक ठरेल, अशी ग्वाही दिली आहे. स्वागताध्यक्ष गुलाब वझे आणि त्यांचे सहकारी गेले दोन महिने अहोरात्र संमेलनाचे हे शिवधनुष्य पेलता यावे म्हणून जिवाचे रान करताना दिसत आहेत. या धावपळीत जाणताअजाणता त्यांच्या हातून शिष्टाचारापासून शुद्धलेखनापर्यंत अनेक चुका, गफलती झाल्या. त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र त्या टीकेकडे दुर्लक्ष करून ‘झाले गेले विसरूनी जावे’ म्हणत ते पुढे चालत राहिले.
तसेही आता हल्ली संमेलनात साहित्य कमी आणि इतर गोष्टींचाच अधिक प्रभाव दिसून येऊ लागला आहे. निधी संकलन करताना तडजोड म्हणून अनेक गोष्टी अपरिहार्य ठरू लागल्या आहेत. त्यामुळे साहित्य संमेलनाला आता गावातील जत्रेचे अथवा आनंदमेळ्याचे स्वरूप येऊ लागले आहे. डोंबिवलीतील संमेलनातही काही वेगळे घडण्याची शक्यता नाही. तिथेही वाङ्मयीन प्रतिभेच्या दर्शनापेक्षा वस्तू आणि सेवांचे प्रदर्शनच अधिक मोठय़ा प्रमाणात असेल, हे उघड आहे. दर वर्षी साधारण जानेवारी महिन्यात ठाणे-कल्याण परिसरात मोठय़ा प्रमाणात मालमत्ता प्रदर्शन भरविले जाते. यंदा तशा स्वरूपाची प्रदर्शने अद्याप भरविण्यात आलेली नाहीत, कारण निश्चलनीकरणामुळे आधीच रडतखडत सुरू असलेल्या गृहनिर्मिती उद्योगाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयत्याच जमणाऱ्या हजारो वाचकांमधून घरांसाठी ‘ग्राहक’ मिळविण्याचा प्रयत्न येथील विकासक करणार यात शंका नाही. डोंबिवली परिसरातील अर्धनागरीकरण झालेल्या गावांमध्ये सत्ता कुणाचीही असली तरी निर्णयाच्या चाव्या एका बडय़ा विकासकाच्याच हाती असतात, हे उघड गुपित आहे. त्यामुळे त्यांचे मंगलगान संमेलनात झाले तरी आश्चर्य वाटायला नको.
डोंबिवलीतील संमेलनातही सहित्यप्रेमींपेक्षा दोन घटका मनोरंजन करण्यासाठी रसिक अधिक प्रमाणात येणार हे गृहीत धरून आयोजकांनी त्याची चोख व्यवस्था केलेली आहे. पूर्वी साहित्य संमेलनात लेखकांना गाठून त्यांची स्वाक्षरी मिळविण्यासाठी चढाओढ व्हायची. आता स्वाक्षरींची जागा सेल्फी छायाचित्रांनी घेतली आहे. डोंबिवलीतील साहित्य संमेलनातही लेखणीचा सेल्फी पॉइंट असेल. याशिवाय अनेक मान्यवर साहित्यिकांचे पुतळे साकारण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर, तुकारामांची मंदिरे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे ठरावीक पठडीचे परिसंवाद ऐकण्याऐवजी हे देखावे पाहणे रसिकांना अधिक आवडणार आहे. हल्ली ग्रंथालयात जाऊन नियमितपणे पुस्तके बदलायला वाचकांना फारसा वेळ नाही. त्यामुळे आपल्याला आवडणारी पुस्तके विकत घेऊन वाचली जात आहेत. साहित्य संमेलनानिमित्त भरणाऱ्या प्रदर्शनात लाखो पुस्तके एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. पुस्तकांवर खास सवलतही असते. त्यामुळे पुस्तकांची तडाखेबंद विक्री होत असते. डोंबिवलीतही बऱ्यापैकी पुस्तकविक्री होईल, या अपेक्षेने महाराष्ट्रभरातील प्रकाशक येथे आपली पुस्तके मांडणार आहेत.
केवळ डोंबिवलीच नव्हे तर बहुतेक शहरांमधील ग्रंथालयांची वाचक सभासद संख्या रोडावली आहे. आता जो तो हाती असलेल्या मोबाइलवरील समाजमाध्यमांमध्ये मश्गूल असलेला दिसतो. अजूनही गेल्या पिढीतील वाचक साहित्याशी असलेली ही नाळ जोडून आहेत. प्रखर हिंदुत्ववादी पु.भा. भावे, गोष्टीवेल्हाळ शन्ना आणि लेखनात मिश्कील पण स्वभावाने गंभीर असणाऱ्या वि.आ. बुवांच्या आठवणी सांगणारे किती तरी जण या शहरात आहेत. स्वत:ला अभिजन म्हणवून घेणारे आणि अभिजात साहित्याचे भोक्ते म्हणून स्वत:ची ओळख सांगणारे काही जण उपनगरीय मध्यमवर्गीयांच्या साहित्यविषयक जाणिवांची खासगीत टिंगल करतात. मात्र याच वर्गाने साहित्यविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांना सातत्याने प्रतिसाद देत ही चळवळ जिवंत ठेवली, हे विसरून चालणार नाही. हेच रसिक प्रदर्शनात पदरमोड करून आवडती पुस्तके विकत घेतात. शनिवार-रविवारच्या सुट्टीत खासगी कामे टाळून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावतात. तुलनेने डोंबिवलीकर रसिकांचा प्रतिसाद चांगला असतो, असा बहुतेक कलावंतांचा अनुभव आहे. नववर्ष स्वागतयात्रेद्वारे गुढीपाडव्याला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देण्यात डोंबिवलीकरांनीच पुढाकार घेतला. पुढील काळात ही प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात अनुकरणीय ठरली. आता त्याच डोंबिवलीत अगदी काही वर्षांपूर्वी ज्या समाजातील बहुसंख्यांना साधी अक्षरओळखही नव्हती, त्या आगरी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युथ फोरम’ने साहित्य संमेलनाचे यजमानपद स्वीकारून या वाङ्मयीन उत्सवाला चाकोरीबद्ध मखरातून बाहेर काढले आहे.