लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: शिळफाटा येथील शेळ महापे रोड परिसरात रस्ता ओलांडत असताना १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शिळ महापे रोड येथील पेट्रोल पंप जवळ १३ वर्षीय मुलगी रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी एका टेम्पोचालकाने तिला धडक दिली. मुलगी चिराडली गेल्याने तिचा जागेच मृत्यू झाला. या प्रकरणी अपघातानंतर शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.

Story img Loader