महिलांचे आरोग्य, महिला विचारासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ म्हणून डोंबिवलीतील काही महिलांनी एकत्र येऊन हिरकणी प्रतिष्ठान संस्थेची गेल्या वर्षी स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिरकणी प्रतिष्ठानतर्फे रविवारी सकाळी ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर सायकल स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत डोंबिवली परिसरातील हिरकणीच्या सदस्यांसह इतर महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. ६४ वर्षाच्या सुषमा आपटे या वृध्द महिलेचा स्पर्धेतील सहभाग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा गटकळ, सचीव मनीषा सुर्वे, जलतरणपटू नीता बोरसे, डिंपल दहिफुले यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे नियोजन केले होते. ३० ते ६० अशा तीन वयोगटातील महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ९० फुटी रस्त्यावर आयोजित सायकल स्पर्धेला कल्याण डोंबिवली पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, साहाय्यक आयुक्त सविता हिले, जिल्हा सायकल संघटनेचे सचिव बागराव, प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठाळे यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविला.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
lucky car tribute Gujarat burial ceremony for car
VIDEO : “बाईsss हा काय प्रकार! ‘लकी’ कारची जंगी अंत्ययात्रा अन् २००० लोकांत पार पडला दफनविधी; खर्च चार लाखांच्या घरात
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात

हेही वाचा : शहापूर तालुक्यातील साकडबाव जंगलात बिबट्याचा संचार; गाईचे वासरू केले फस्त

कुडकुडणारी थंडी
रविवार सकाळच्या कुडकुडणाऱ्या थंडीत काही महिलांची लहान मुले आई कशी सायकल चालविते पाहण्यासाठी उपस्थित होती. ९० फुटी रस्त्यावर नियमित फिरण्यासाठी येणारे रहिवासी स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते. आपण स्पर्धा जिंकलीच पाहिजे म्हणून प्रत्येक स्पर्धक महिलेची चढाओढ कौतुकास्पद होती. ३०, ४० आणि ५० अशा वयोगटातील महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

सुदृढतेसाठी संघटन
बहुतांशी महिला नोकरी, व्यवसाय करतात. कुटुंब, नोकरी, व्यवसाय सांभाळून अनेक महिलांना मोकळा वेळ मिळत नाही. काही महिला अन्य काही कारणांने ताण, तणावात असतात. अशा महिलांसाठी मन मोकळे करण्यासाठी, विचार व्यक्त करण्यासाठी एखादे मोकळे व्यासपीठ असावे म्हणून हिरकणी प्रतिष्ठानची स्थापना केली. या स्थापनेला आता एक वर्ष पूर्ण झाले. महिलांचे आरोग्य, सुदृढता हा विचार करुन सायकल क्लबची संकल्पना पुढे आली. त्यामधून सायकल क्लब स्थापन झाला. कल्याण डोंबिवली पालिका, शासकीस, पोलीसांच्या उपक्रमामध्ये हिरकणीच्या महिला सहभागी होतात. शहरासाठी सामाजिक दायित्व भावनेतून योगदान देतात. प्रत्येकीच्या सुखदुखात सहभागी होतात. सायकल क्लब, प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहर हितासाठी योगदान देण्याचे आमचे नियोजन आहे, असे ‘हिरकणी’च्या अध्यक्षा सुरेखा गटकळ यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील संगणकातील प्रोसेसरची चोरी

संघटनात्मक ताकद
हिरकणी प्रतिष्ठानच्या महिला सदस्य अनेक समाजपयोगी उपक्रमात सहभागी होत आहेत. कुटुंबाच्या संघटना बरोबर घरातील स्वच्छतेत महिलेचे योगदान मोठे असते. त्यामुळे घरात एकजूट, स्वच्छतेत नेहमीच पुढे असलेल्या हिरकणीच्या महिलांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर स्वच्छता, स्वच्छ, सुंदर शहर, नागरी अभियानांमध्ये सहभागी होऊन शहरासाठी आपले योगदाने द्यावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता भागवत यांनी केले.

यशस्वी सायकल स्पर्धक
३० ते ४० वयोगट- परिणिता गोसावी(प्रथम), किरण कानसे(व्दितीय), तेजस्विनी शेलटे(तृतीय) क्रमांक, ४१ ते ५० वयोगट- नीता सोनवानी, शुभांगी मगर, विभावरी इखे, ५१ ते ६० गट- माधुरी कारंडे, ऋती अग्निहोत्री, मंजुषा गोरे. ६४ वर्षाच्या सुषमा आपटे यांना उत्तजेनार्थ बक्षिस जाहीर करण्यात आले.