ठाणे : कामगार नेते तसेच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांच्याविरोधात नदीपात्रात विहीरीचे बांधकाम केल्याप्रकरणी तोकवडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन राजे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पक्षाचा पाठींबा उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरबाड येथील साखरे गाव भागात ऋग्वेद यांची जागा आहे. येथील डोईफोडी नदीपात्रात त्यांनी अनधिकृतरित्या ३० फुट खोल विहीरीचे बांधकाम केल्याचा तक्रार २०२० मध्ये तेथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयास दिली होती. त्यानंतर जून महिन्यात  डोईफोडी नदीच्या पात्रात २५ फूट खोल विहीर बांधण्यात आल्याचा अहवाल भूमि अभीलेख विभागाने तयार करुन तो तहसिलदार कार्यालयास सादर केला होता. सोमवारी प्रशासनाने जागेची पाहणी केली असता, ऋग्वेद यांनी लघुपाठबंधारे विभाग आणि ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यानंतर तलाठी संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ऋग्वेद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन राजे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पक्षाचा पाठींबा उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case filed against rajan raje son president dharmarajya party son rigveda ysh