भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी फेसबुक या समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी मयुर बोरोले यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा भाजपाचा आरोप

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सुमारे महिन्याभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर टिका केली जात होती. कॅंाग्रेसचे ठाणे जिल्ह्यातील युवक कॅंाग्रेसचे सरचिटणीस मयुर बोरोले यांनीही टिका व्यक्त करताना आक्षेपार्ह टिप्पणी फेसबुक या समाजमाध्यमावर केली होती. हा मजकुर भाजपच्या पदाधिकाऱ्याला मोबाईवर आढळून आल्याने त्यांनी याप्रकरणी मयुर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.