कल्याण – एका महिलेची छेड काढल्याच्या वादातून बुधवारी रात्री आंबिवली जवळील वडवली, इराणी वस्तीमधील तरुणांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली होती. रात्रीच्या वेळेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शांततेचा भंग केल्याबद्दल खडकपाडा पोलिसांनी नऊ तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामध्ये वडवलीतील एका माजी नगरसेवकाच्या मुलाचा सहभाग आहे. आरोपींमध्ये वैभव दुर्योधन पाटील (२९, रा. वडवली), वैभव पाटील, मोहम्मद नासर इराणी, हॅरी उर्फ हुसेनी जाफरी, अब्बास आणि इतर चार तरुण यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

हेही वाचा – पुणे : डेक्कन क्वीनच्या डब्यांतून धूर, ठाकूरवाडी स्थानकानजीक घटना; गाडीला पोहोचण्यास २५ मिनिटे विलंब

खडकपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार योगेश बुधकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी एक महिला रात्रीच्या वेळेत हाॅटेल जवळ भोजनासाठी उभी होती. यावेळी काही तरुण आपल्याविषयी काही बोलत आहेत. आपली छेड काढत आहे याचा संशय आल्याने तिने यासंदर्भात आपला पती, पोलिसांना कळविले होते. या महिलेने पोलिसांना कळविल्याने पोलीस ठाण्यात हा विषय दोन्ही बाजूने सामंजस्याने मिटविण्यात आला होता. रात्रीच्या वेळेत इराणी वस्तीमधील एक गट वडवली गाव हद्दीत पुन्हा या घटनेचा संबंधित तरुणांना जाब विचारण्यासाठी रात्रीच्या वेळेत गेला होता. यावेळी झालेल्या बोलाचालीतून दोन गटात तुफान राडा झाला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been filed against the youths who caused a scuffle in ambivali irani settlement ssb