भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांच्याविरोधात वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा रशीद यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. रिदा रशीद यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- हद्दपार आरोपीस अटक; ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई

पीडीत महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्या रिदा रशीद यांना ओळखत होत्या. त्यावेळी रिदा यांनी त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार, रिदा रशीद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा रशीद या भाजपच्या महिला मोर्चाचा उपाध्यक्ष आहेत. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिळफाटा येथे एका उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जात असताना आव्हाड यांनी विनयभंग केल्याची तक्रार रिदा रशीद यांनी केली होती. या आरोपानंतर आव्हाड हे आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार झाले होते. रिदा रशीद यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.